नांदेड (प्रतिनिधि) – नांदेड शहरातून ग्रामीण भागात बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर, पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने नांदेड शहरात धाडसी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण ५,४७,५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सापळा रचून कारवाई पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाने २७ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस ठाणे भाग्यनगर हद्दीतील सौभद्र मंगल कार्यालयासमोर सापळा रचला. यादरम्यान देशी व विदेशी दारूची अवैध वाहतूक करत असलेली एक टाटा टियागो कार पकडण्यात आली. या वाहनातून २,४७,५३० रुपये किमतीची देशी-विदेशी दारू आणि ३,००,००० रुपये मूल्याची कार, असा एकूण ५,४७,५३० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. हिंगोलीतील आरोपी ताब्यात या प्रकरणात विशाल दिलीप राठोड, वय व राहणार कोंडापूर तांडा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर पोलीस ठाणे भाग्यनगर येथे गुन्हा नोंद क्रमांक ५५४/२०२६, कलम ६५ ई महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कारवाईत सहभागी पथक ही उल्लेखनीय कारवाई पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस अंमलदार प्रदिप खानसोळे, गणेश राठोड, संदीप वाघाडे आणि गजानन डवरे यांनी पार पाडली. या कामगिरीबद्दल पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे. खबर हेल्पलाइनवरून माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांना देता यावी, यासाठी पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने ९१ ५० १०० १०० हा मोबाईल क्रमांक असलेली खबर हेल्पलाइन सुरू केली आहे. नागरिकांनी अशा बेकायदेशीर कामांची माहिती या हेल्पलाइनवर देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 25 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मुदखेडमध्ये बार फोडून विदेशी दारू व रोख रक्कम लंपास;रामतीर्थमध्ये घरफोडी; ३ लाख ३० हजारांचे दागिने चोरीला