मुदखेड (प्रतिनिधी) – मुदखेड येथील साई चंद्राबाई अँड रेस्टॉरंटमध्ये चोरट्यांनी प्रवेश करून काउंटरमधील रोख रक्कम आणि विदेशी दारूच्या बाटल्या असा एकूण ३२ हजार ९९० रुपयांचा ऐवज चोरून नेला. दि. १७ सप्टेंबर रोजी रात्री ११ ते १८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेदरम्यान ही घटना घडली. बारचे कुलूप तोडून व खिडकीतून आत प्रवेश करून चोरट्यांनी काउंटरमधील ६०० रुपये रोख आणि विदेशी दारूच्या बाटल्या लंपास केल्या. या प्रकरणी तक्रारदार बाबू रघुनाथराव तेलंग (वय ३९, रा. शिक्षक कॉलनी, मुदखेड) यांच्या फिर्यादीवरून मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ), ३२४(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामतीर्थमध्ये घरफोडी; ३ लाख ३० हजारांचे दागिने चोरीला रामतीर्थ – नरसी येथील एका घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख ३० हजार ३३० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. दि. २५ सप्टेंबर रोजी रात्री १ ते सकाळी ८ वाजेदरम्यान फिर्यादी यांच्या राहत्या घरी ही घरफोडी झाली. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील स्टीलच्या डब्यात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी अनिता नवाजी कुडकेकर (वय ४३, रा. शिवकृपा मंगल कार्यालयाच्या बाजूला, नरसी, ता. नायगाव) यांच्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३०५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Kanthak Suryatal Post Views: 86 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कहाळा शेतशिवार आणि गाडीपूरा येथे जुगार अड्ड्यांवर छापे: नांदेड पोलिसांची धडक मोहीम