नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शाहाजी उमाप यांच्या पथकाने परभणी जिल्ह्यात मटका बुकींवर कारवाई केली. पथकाने दोन स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण १२ जणांवर गुन्हे दाखल करून ३६ हजार १६० रुपये रोख व सहा मोबाईल असा एकूण ७५ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या पथकाने १६ सप्टेंबर २०२६ रोजी नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इटलाापूर मोहल्ला येथे छापा टाकला. मुक्ताराम साखरे यांच्या घरात सुरू असलेल्या मटका बुकीवर कारवाई करताना २९ हजार १५० रुपये रोख आणि २७ हजार ४०० रुपये किमतीचे चार मोबाईल, असा एकूण ५६ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात सात जणांविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६९६/२०२६, कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पथकाने नानलपेठ हद्दीतील सोना हॉटेल, जुना मोंढा परिसरात सुरू असलेल्या मटका बुकीवर धाड टाकली. या कारवाईत ७ हजार १० रुपये रोख व १२ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, असा एकूण १९ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात पाच जणांविरुद्ध गुन्हा क्रमांक ६९७/२०२६, कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या दोन गुन्ह्यांमध्ये असलेले एकूण बारा आरोपी पुढील प्रमाणे आहेत. मुक्ताराम नारायणराव साखरे प्रदीप श्रीधरराव दडके विलास दिगंबर म्हत्रे शेख गौस शेख जानी शेख शाहेद शेख साहेब वसंत आबासाहेब कदम बुकी मालक गोपाळ ढगे वैभव अशोकराव मोरे बालाजी शिवाजीराव नवघरे आकाश प्रकाशराव भोपालकर गोपाळ ढगे राजू पाटमासे कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, संदीप वाघाडे आणि गजानन डवरे यांनी सहभाग घेतला. पथकाच्या कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शाहाजी उमाप यांनी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित केले. दरम्यान, अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवण्यासाठी खबर हेल्पलाइन क्रमांक ९१५१००१०० सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती या हेल्पलाइनद्वारे पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 103 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सोशल मीडियावरील हिरोगिरी आणि कायद्याचा बडगा: स्वतंत्र भारद्वाज प्रकरणाचे संपादकीय विश्लेषण