नांदेड (प्रतिनिधी) – गुटखा, मटका-जुगार, अवैध दारू विक्री तसेच अवैध शस्त्रांविरोधात नांदेड परिक्षेत्र पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली १ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत ‘अवैध व्यवसाय निर्मूलन मोहीम-३’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या १ ते १५ सप्टेंबर या पंधरवड्यात परिक्षेत्रात तब्बल ९२२ कारवाया करण्यात आल्या असून १,३४७ इसमांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत गुटखा विक्रीप्रकरणी १४ गुन्हे, महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत १२८ गुन्हे, महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ५९० गुन्हे, शस्त्र अधिनियमान्वये १७ गुन्हे, तर इतर कायद्यांखाली १७३ गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवायांमध्ये एकूण १० कोटी १६ लाख ९ हजार २९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हानिहाय आकडेवारीनुसार नांदेड जिल्ह्यात विविध कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला. परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातही पोलिसांनी अवैध व्यवसायांविरोधात सातत्याने कारवाई केली आहे. एकूण आकडेवारीत गुटखा प्रकरणांत १४ गुन्हे, जुगार-मटका प्रकरणांत १२८, दारूबंदी कायद्यान्वये ५९०, शस्त्र अधिनियमान्वये १७ आणि इतर कायद्यांखाली १७३ गुन्हे दाखल झाले आहेत. या मोहिमेत पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने हिंगोली शहरातील दोस्ती मित्र मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट या क्लबवर कारवाई केली. तसेच लातूर जिल्ह्यातील देवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे मोघा येथील रानमाळा जुगार क्लबवरही कारवाई करण्यात आली. विशेष पथकाने अहमदपूर, रेणापूर, निलंगा आणि लातूर शहरात मटका-जुगाराविरोधातही कारवाया केल्या. दरम्यान, नागरिकांना आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचविता यावी, यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाकडून ‘खबर’ हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. ९१ ५० १०० १०० या मोबाईल क्रमांकावर नागरिकांनी अवैध व्यवसायांची माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. जिल्हा गुटखा मटका/जुगार दारु शस्त्र अधिनियम इतर केसेस गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या नांदेड 7 14,57,702 11 40 26,69,780 174 176 8,12,647 183 5 385,00 8 34 5,68,78,105 83 परभणी 3 3,44,171 3 24 17,20,450 59 114 6,52,040 119 5 56,500 6 24 1,04,50,810 31 हिंगोली 3 64,112 4 25 30,21,565 99 159 7,02,695 162 3 1,300 3 78 1,07,76,368 79 लातूर 1 1,16,880 2 40 43,25,520 129 141 6,53,340 145 4 0 6 37 68,66,544 41 एकुण 14 19,82,865 20 128 1,17,37,315 461 590 28,20,722 609 17 96,300 23 173 8,49,71,827 234 Kanthak Suryatal Post Views: 25 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ११ कोटी ८५ लाखांचा जमीन फसवणुकीचा खेळ!एकाच जमिनीच्या बनावट सौदाचिठ्ठ्या; ३५ हून अधिक जणांना गंडा