मराठवाडा पेटला तर दिल्लीपर्यंत वणवा जाईल; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरणार नांदेडमधील धरणे आंदोलनात सरकारवर शिवसेनेचा हल्लाबोल; कर्जमाफी, दुष्काळी मदत आणि सिंचन प्रकल्पांवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर नांदेड (प्रतिनिधी) – मराठवाड्यातील दुष्काळ, शेतकऱ्यांची कर्जमाफी, सिंचन प्रकल्पांची रखडलेली कामे, बेरोजगारी आणि महागाईच्या प्रश्नांवरून शिवसेनेने राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. नांदेडमध्ये आयोजित धरण आंदोलनात शिवसेना नेत्यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष सुरू राहिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा दिला. तप्त उन्हात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी भाषण करताना शिवसेना नेत्यांनी मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीवर तीव्र संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांचा अंत पाहू नका. मराठवाडा खदखदतोय. दुष्काळाने सगळं सुकलं आहे. घराघरातील चुली पेटण्याची वेळ येऊ देऊ नका,असा इशारा देण्यात आला. आंदोलन केवळ धरणे आंदोलनापुरते मर्यादित राहणार नसून मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी मराठवाड्यातील परिस्थितीची माहिती राज्य सरकारपर्यंत पोहोचवावी, अशी मागणीही करण्यात आली. कर्जमाफीवरून सरकारला लक्ष्य शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरूनही सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. उद्योगपतींच्या कर्जमाफीवर प्रश्न उपस्थित करताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मात्र नियम, अटी आणि कागदपत्रांची पूर्तता का लावली जाते, असा सवाल करण्यात आला. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय तातडीने घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातील कर्जमाफीचा दाखला देत, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे वक्त्यांनी सांगितले. अशोकराव चव्हाणांनाही लक्ष्य नांदेडचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यावरही भाषणातून निशाणा साधण्यात आला. तुम्ही भाजपमध्ये गेला आहात, तर केंद्र सरकारकडे मराठवाड्याच्या दुष्काळाचा प्रश्न मांडा. कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून द्या, असे आवाहन करण्यात आले. नांदेड-मराठवाड्यातील रखडलेले सिंचन व पाणी प्रकल्प पूर्ण करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. रोजगारासाठी हेलिकॉप्टर नव्हे, उद्योग हवा नांदेडमध्ये मोठे प्रकल्प आणण्याच्या घोषणांवरही शिवसेनेने टीका केली. हेलिकॉप्टर किंवा विमाननिर्मिती प्रकल्पांच्या घोषणांपेक्षा स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार देणारे उद्योग आणण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. नांदेडच्या तरुणांना रोजगार मिळेल, असे उद्योग उभे करा, अशी मागणी करण्यात आली. मराठवाड्यात पडलेली ठिणगी दिल्लीपर्यंत जाईल मराठवाड्याला ऐतिहासिक संघर्षाची परंपरा असल्याचे सांगत आंदोलनकर्त्यांनी सरकारला थेट इशारा दिला. मराठवाड्यातील जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मराठवाडा महाराष्ट्राला दिशा देतो. क्रांतीची ठिणगी मराठवाड्यात पडते आणि तिचा वणवा दिल्लीपर्यंत जातो. ही ठिणगी पडली आहे; आता हा वणवा भडकणार,असा आक्रमक इशारा भाषणातून देण्यात आला. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचाही उल्लेख करण्यात आला. सरकारने जनतेच्या विविध प्रश्नांवर संवेदनशीलतेने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात अंबादास दानवे, आमदार प्रवीण स्वामी, आमदार राहुल पाटील, मोहन पाटील, बबन थोरात, किशोर पोतदार, अनुसया ताई यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकरी, दुष्काळ, बेरोजगारी आणि सिंचनाच्या प्रश्नांवरून सुरू झालेला हा संघर्ष आगामी काळात अधिक तीव्र करण्याचा इशारा देत शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे राज्य आणण्यासाठी संघर्ष सुरूच राहील,असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. ‘गांडू’ द बॉस – खा. संजय राऊत मराठवाडा पेटला तर दिल्लीपर्यंत वणवा जाईल; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरणारनांदेडमधील धरणे आंदोलनात सरकारवर शिवसेनेचा हल्लाबोल; कर्जमाफी, दुष्काळी मदत आणि सिंचन प्रकल्पांवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर नांदेड (प्रतिनिधी) – मराठवाड्यातील दुष्काळ, शेतकऱ्यांची कर्जमाफी, सिंचन प्रकल्पांची रखडलेली कामे, बेरोजगारी आणि महागाईच्या प्रश्नांवरून शिवसेनेने राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. नांदेडमध्ये आयोजित धरण आंदोलनात शिवसेना नेत्यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष सुरू राहिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा दिला. तप्त उन्हात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी भाषण करताना शिवसेना नेत्यांनी मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीवर तीव्र संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांचा अंत पाहू नका. मराठवाडा खदखदतोय. दुष्काळाने सगळं सुकलं आहे. घराघरातील चुली पेटण्याची वेळ येऊ देऊ नका,असा इशारा देण्यात आला. आंदोलन केवळ धरणे आंदोलनापुरते मर्यादित राहणार नसून मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी मराठवाड्यातील परिस्थितीची माहिती राज्य सरकारपर्यंत पोहोचवावी, अशी मागणीही करण्यात आली. कर्जमाफीवरून सरकारला लक्ष्य शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरूनही सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. उद्योगपतींच्या कर्जमाफीवर प्रश्न उपस्थित करताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मात्र नियम, अटी आणि कागदपत्रांची पूर्तता का लावली जाते, असा सवाल करण्यात आला. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय तातडीने घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातील कर्जमाफीचा दाखला देत, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे वक्त्यांनी सांगितले. अशोकराव चव्हाणांनाही लक्ष्य नांदेडचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यावरही भाषणातून निशाणा साधण्यात आला. तुम्ही भाजपमध्ये गेला आहात, तर केंद्र सरकारकडे मराठवाड्याच्या दुष्काळाचा प्रश्न मांडा. कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून द्या, असे आवाहन करण्यात आले. नांदेड-मराठवाड्यातील रखडलेले सिंचन व पाणी प्रकल्प पूर्ण करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. रोजगारासाठी हेलिकॉप्टर नव्हे, उद्योग हवा नांदेडमध्ये मोठे प्रकल्प आणण्याच्या घोषणांवरही शिवसेनेने टीका केली. हेलिकॉप्टर किंवा विमाननिर्मिती प्रकल्पांच्या घोषणांपेक्षा स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार देणारे उद्योग आणण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. नांदेडच्या तरुणांना रोजगार मिळेल, असे उद्योग उभे करा, अशी मागणी करण्यात आली. मराठवाड्यात पडलेली ठिणगी दिल्लीपर्यंत जाईल मराठवाड्याला ऐतिहासिक संघर्षाची परंपरा असल्याचे सांगत आंदोलनकर्त्यांनी सरकारला थेट इशारा दिला. मराठवाड्यातील जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मराठवाडा महाराष्ट्राला दिशा देतो. क्रांतीची ठिणगी मराठवाड्यात पडते आणि तिचा वणवा दिल्लीपर्यंत जातो. ही ठिणगी पडली आहे; आता हा वणवा भडकणार,असा आक्रमक इशारा भाषणातून देण्यात आला. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचाही उल्लेख करण्यात आला. सरकारने जनतेच्या विविध प्रश्नांवर संवेदनशीलतेने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात अंबादास दानवे, आमदार प्रवीण स्वामी, आमदार राहुल पाटील, मोहन पाटील, बबन थोरात, किशोर पोतदार, अनुसया ताई यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकरी, दुष्काळ, बेरोजगारी आणि सिंचनाच्या प्रश्नांवरून सुरू झालेला हा संघर्ष आगामी काळात अधिक तीव्र करण्याचा इशारा देत शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे राज्य आणण्यासाठी संघर्ष सुरूच राहील,असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. धरणे आंदोलन सुरु असतांना रुग्ण वाहिका आली तेव्हा सर्वच आंदोलक पटापट उठले आणि रुग्ण वाहिलेला जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला Kanthak Suryatal Post Views: 67 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सागर बारसमोर मध्यरात्री रंगला २ ब्रास रेतीचा नाट्यप्रयोग: जरा फोनवर बोला ना म्हणणाऱ्या मध्यस्थासह ५ जणांवर कायद्याचा दणका!