मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्र पोलीस दलात प्रदीर्घ सेवा बजावणाऱ्या पोलीस अंमलदारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाने सन २०२५-२०२६ या वर्षासाठी निःशस्त्र पोलीस उपनिरीक्षक पदोन्नतीची निवडसूची जाहीर केली आहे. या यादीनुसार राज्यभरातील निरनिराळ्या पोलीस आयुक्तालय व जिल्हा घटकांमधील एकूण ३३३ पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मराठवाडा व विदर्भातील अंमलदारांचा मोठा भरणा या निवडसूचीमध्ये छत्रपती संभाजीनगर शहर घटकातून सर्वाधिक ९३ अंमलदारांची निवड झाली आहे. त्यापाठोपाठ नांदेड घटकातील ८०, अकोला घटकातील २३, सिंधुदुर्गमधील १९, परभणी व हिंगोलीतील प्रत्येकी १३ अंमलदारांचा समावेश आहे. याशिवाय मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर यांसारख्या शहरांतील व लोहमार्ग पोलीस विभागातील अंमलदारांचीही PSI पदी वर्णी लागली आहे. महसुली संवर्ग पसंती व प्रक्रिया पोलीस महासंचालक कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, पदोन्नती समितीने पात्र ठरवलेल्या अंमलदारांकडून महसुल विभागाची पसंती मागवण्यात येत आहे. तसेच संबंधित घटकांनी या अंमलदारांचे बंधपत्र प्राप्त करून विहित वेळेत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पदोन्नतीमुळे राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यास मदत होणार असून पोलीस प्रशासनाला नवीन अधिकारी उपलब्ध होणार आहेत. पोलीस अंमलदारांचे घटक/जिल्हानिहाय वर्गीकरण यादीतील सर्व ३३३ पोलीस अंमलदारांचे त्यांच्या सध्याच्या नेमणुकीच्या घटकानुसार वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे: अ.क्र. सध्याची नेमणूक / घटक निवड झालेल्या अंमलदारांची संख्या १ छत्रपती संभाजीनगर शहर ९३ २ नांदेड ८० ३ अकोला २३ ४ सिंधुदुर्ग १९ ५ परभणी १३ ६ हिंगोली १३ ७ वाशीम ९ ८ ठाणे शहर ७ ९ जळगाव ६ १० जालना ६ ११ बीड ६ १२ छत्रपती संभाजीनगर ग्रामीण ५ १३ बुलढाणा ५ १४ लोहमार्ग पुणे ५ १५ पुणे शहर ४ १६ धाराशिव ३ १७ नवी मुंबई ३ १८ पिंपरी चिंचवड ३ १९ सोलापूर शहर ३ २० अमरावती ग्रामीण २ २१ अहिल्यानगर २ २२ कोल्हापूर २ २३ नागपूर ग्रामीण २ २४ नाशिक ग्रामीण २ २५ मुंबई शहर २ २६ रत्नागिरी २ २७ लातूर २ २८ सोलापूर ग्रामीण २ २९ अमरावती शहर १ ३० ठाणे ग्रामीण १ ३१ धुळे १ ३२ नंदुरबार १ ३३ नाशिक शहर १ ३४ रायगड १ ३५ सातारा १ ३६ लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर १ ३७ लोहमार्ग मुंबई १ एकूण सर्व घटक ३३३ वाचकांच्या सोई साठी निवड सूची ची पीडीएक संचिका जोडली आहे …. 08.09.2026 पोलीस अंमलदारांची PSI पदोन्नतीची निवड यादी Kanthak Suryatal Post Views: 1,158 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation रायबरेलीत राहुल गांधींच्या गाडीला घेराव: पीआर शो की नैसर्गिक जनसमुदाय युपीच्या राजकारणातील मोठ्या भूकंपाचे संकेत! अर्थव्यवस्थेचे सर्वात भयानक सत्य : कॉर्पोरेट गब्बर, जनता बेजार! २,६५८ कोटींच्या जाहिरातींमागे काय लपवले जातेय?