भोकर (प्रतिनिधी) – ऊसतोडीसाठी जाण्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना भोकर शहरातील बटाळा रोड परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ६ वाजता बटाळा रोड, भोकर येथे आरोपी हनमंत रमेश भोसले (वय ३५) याचा पत्नी ममता हनमंत भोसले (वय ३१) हिच्यासोबत ऊसतोडीसाठी जाण्याच्या कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी हनमंत भोसले याने ममता हिचा गळा आवळून तिचा खून केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी मयत ममता भोसले यांचे नातेवाईक सोसला जीवन चव्हाण (वय ३५, रा. साईनगर, पिटलेवाडा, मंडळ जि. आदिलाबाद) यांच्या फिर्यादीवरून भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. ४६५/२०२६, कलम १०३(१) बीएनएस-२०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि कांबळे करीत असून, आरोपीविरुद्ध अटकेची कारवाई करण्यात आली आहे. घटनेमागील नेमके कारण तसेच इतर बाबींचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. Kanthak Suryatal Post Views: 618 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडमध्ये टॅक्सी बुकिंगच्या नावाखाली तरुणाची १ लाख ६५ हजारांची ऑनलाइन फसवणूक धर्माबादमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास