धर्माबाद (प्रतिनिधी) – धर्माबाद शहरातील पीएम कॉलनी परिसरात घरफोडीची घटना घडली असून, चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता ते १ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. धर्माबाद येथील पीएम कॉलनीत राहणाऱ्या अश्विनी गजानन टापरे यांच्या घराला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केले. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ५३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी अश्विनी टापरे यांनी धर्माबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक २१३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता-२०२३ मधील कलम ३३१(३), ३०५ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घरफोडीचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पगलवाड करीत असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य तांत्रिक बाबींच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. Kanthak Suryatal Post Views: 613 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ऊसतोडीला जाण्यावरून वाद; पतीने पत्नीचा गळा आवळून खून मराठा आरक्षणासाठी नांदेड कडकडीत बंद