न्यायाधीशांच्या न्यायाचा ऑन-द-स्पॉट निकाल! भर न्यायालयात न्यायमूर्तींनाच सक्तीची निवृत्ती; बीडच्या आंबेजोगाई न्यायालयातील दुसरा ऐतिहासिक प्रताप

आंबेजोगाई (प्रतिनिधी) - न्याय देण्याचे पवित्र काम करणाऱ्यांना जेव्हा स्वतःच सक्तीच्या निवृत्तीचा तात्काळ न्याय मिळतो, तेव्हा न्यायाच्या मंदिरात कसा आनंदोत्सव साजरा होत असेल, याची कल्पनाच केलेली बरी. आंबेजोगाई बीड येथील न्यायालयात नुकताच असाच एक अतिशय सुंदर आणि सनसनाटी प्रकार घडला आहे. नेहमीप्रमाणे न्यायालयाचे कामकाज अगदी थाटामाटात सुरू होते. नांदेड अधिवक्ता संघातील तिसऱ्या पिढीतील अत्यंत नामांकित वकील आणि कधी काळी स्वतः न्यायदंडाधिकारी राहिलेले महत्त्वपूर्ण व्यक्ती एड. शिरीष नागापूरकर यांच्या कार्यालयात ज्युनियर म्हणून वकिलीचे धडे घेतलेल्या असलेल्या डॉ. रचना तेहरा या आपल्या अंबेजोगाई न्यायालयात बसून रोजची कामे नेहमीप्रमाणे निकाली काढत होत्या. अनेक प्रकरणांचे निकाल त्यांनी लावले आणि दुपारच्या सत्रात कामकाज सुरू असतानाच, अचानक उच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला हातात घेऊन बीड जिल्हा न्यायाधीशांचे पथक प्रत्यक्ष न्यायालयात अवतरले.
चालू न्यायालयातच सक्तीची निवृत्ती!दुसऱ्यांच्या प्रकरणांचा निकाल लावणाऱ्या डॉ.रचना तेहरा यांना स्वतःचा ऑन-द-स्पॉट निकाल मात्र दुपारीच ऐकावा लागला. जिल्हा न्यायाधीशांचे पथक थेट न्यायालयात घुसले आणि चालू कोर्टातच त्यांना सक्तीच्या सेवानिवृत्तीवर पाठवल्याचा प्रेमळ संदेश सोपवून तात्काळ रवाना केले. आंबेजोगाई जिल्हा न्यायालयात अशा प्रकारची ही पहिलीच अभूतपूर्व घटना नाही. सुमारे १५ वर्षांपूर्वी याच न्यायालयात, याच खोलीमध्ये एका अतिरिक्त सत्र न्यायाधीशांना अशीच सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात आली होती. त्यामुळे या विशिष्ट खोलीला न्यायाधीशांच्या सक्तीच्या निवृत्तीची काही विशेष दैवी सिद्धी लाभली असावी, असा कयास लावायला हरकत नाही.उच्च न्यायालयाच्या गुप्तहेरांची भिकाऱ्यासारखे फिरण्याची अनोखी किमया!आता डॉ.रचना तेहरा यांनी नेमका काय पराक्रम केला, याची कोणतीही सविस्तर माहिती सध्या उपलब्ध झालेली नाही. पण काही चुकीचे केले तर जीवनात त्याचे उत्तर द्यावेच लागते, हा नियम शेवटी त्यांनाही लागू झाला. ही सर्व कार्यवाही मुंबई देशांतर आणि दक्षता पथकाच्या चौकशीनंतर झाली आहे. या दक्षता पथकाची काम करण्याची पद्धत तर आणखीनच रंजक आहे. दक्षता पथकातील लोक दिवसभर भिकाऱ्यासारखे फिरून सर्व माहिती गोळा करतात आणि उच्च न्यायालयाला देतात. त्यानंतरच उच्च न्यायालयाकडून अशा कारवायांचे आदेश सुटतात. यापूर्वी महाराष्ट्रात कंधार आणि नांदेड जिल्ह्यातही अशाच कारवायांचे धमाके उडाले आहेत.
नांदेडच्याभूमिपुत्रीचा दुर्दैवी गौरव!विशेष म्हणजे डॉ.रचना तेहरा या मूळच्या नांदेडच्या रहिवासी आहेत. नांदेडच्याच अत्यंत प्रतिष्ठित वकिली घराण्यातील एड.शिरीष नागापूरकर यांच्याकडे त्यांनी ज्युनियर म्हणून काम केले होते. नांदेडच्या अशा एकाभूमिपुत्रीवर ही कायदेशीर कारवाई व्हावी, ही खरंच नांदेडकरांसाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!