नांदेड –  महापालिकेतील सांगवी भागातील प्रभाग क्रमांक तीन च्या नगरसेविका व त्यांचे पती गजानन पाटील यांनी नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीत अनाधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी तसेच विमानतळ प्राधिकरणाच्या नियमाची पायमल्ली केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करून शिंदे गटाच्या नगरसेविकेचे पद रद्द करण्याची मागणी ठाकरे सेनेचे मुख्य महानगर प्रमुख प्रकाश मारावार. उपजिल्हाप्रमुख विजय बगाटे. नवजीत सिंग गाडीवाले. नांदेड महापालिकेतील ठाकरे सेनेच्या उमेदवार बेगाबाई विश्वनाथराव कोकाटे. पिंटू पाटील कोकाटे नितीन सरोदे यांनी मनपा आयुक्त यांच्याकडे केले.
प्रभाग क्रमांक 3 मधील सांगवी भागात विमानतळ कंपाउंड वॉल लगत गजानन पाटील व शिंदे गटाच्या नगरसेविका यांनी परवानगी व्यतिरिक्त अनाधिकृत बांधकाम ग्राउंड फ्लोअर. फर्स्ट फ्लोंवर. सेकंड फ्लोअर. असे एकूण731.771 चौरस मीटर बांधकाम अनधिकृत करून महापालिका अधिनियमाचा भंग केल्याप्रकरणी तसेच विमान प्राधिकरणाच्या हद्दीत प्राधिकरणाच्या नियमाची पायमल्ली करून विमानतळास धोका निर्माण केल्याप्रकरणी गजानन पाटील व शिंदे गटाच्या नगरसेविका यांच्यावर गुन्हा दाखल करावी तसेच नगरसेविका पद रद्द करण्याची मागणी नांदेडच्या ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
सत्तेचा दुरुपयोग करत नगर विकास खात्याचे एकनाथ शिंदे व त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचे सहकारी गजानन पाटील यांनी नांदेड शहरात अनाधिकृत बांधकामाचा नवा पायंडा निर्माण केला. महापालिका अधिनियम भंग केल्याप्रकरणी शिंदे गटाच्या नगरसेविकाचा पद तात्काळ रद्द करून पोटनिवडणूक घेण्याची मागणी ठाकरे सेनेचे मुख्य महानगर प्रमुख प्रकाश मारावार. प्रभाग क्रमांक तीन चे ठाकरे सेनेचे उमेदवार बेगाबाई विश्वनाथ कोकाटे. उपजिल्हाप्रमुख विजय बगाटे. सरदार नवज्योत सिंग गाडीवाले. नितीन सरोदे पिंटू पाटील कोकाटे यांनी जिल्हाधिकारी माननीय श्री कर्डिले साहेब. मनपा आयुक्त डोईफोडे यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!