देगलूर (प्रतिनिधी) – तालुक्यातील नवीन हावरगा परिसरात सुरू असलेल्या तिर्रट नावाच्या जुगार अड्ड्यावर देगलूर पोलिसांनी छापा टाकून सात जुगाऱ्यांना रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि तीन दुचाकी असा एकूण २ लाख ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत ३० ऑगस्ट रोजी देगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना नवीन हावरगा येथील पडीत अंगणवाडीसमोरील मोकळ्या जागेत काही जण पैशांची बाजी लावून तिर्रट’ जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी सात जण जुगार खेळताना आढळून आले. पंचांसमक्ष घटनास्थळाची पाहणी केली असता जुगाराचे साहित्य, रोख ५ हजार ३३० रुपये आणि तीन दुचाकी वाहने असा एकूण २ लाख ३३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४०४/२०२६, कलम १२(अ), महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर, पोलीस उपअधीक्षक वैभव पडवळ आणि पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनमंत शिंदे तसेच पोलीस अंमलदार किरणकुमार वाघमारे व विशाल अटकोरे यांनी केली. अवैध जुगार, मटका आणि इतर बेकायदेशीर प्रकारांविरुद्ध पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असून, अशा अवैध हालचालींची माहिती पोलिसांना देऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिसांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 173 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation गोल्डन सिटी लोह्यात भरदिवसा घरफोडी; १.१० लाखांचा मुद्देमाल लंपास डीआयजी पथकाची नांदेडमध्ये अवैध वाळू उपशावर पोलिसांचा मोठा दणका