लोहा : गोल्डन सिटी, लोहा येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना २९ ऑगस्ट रोजी रात्री १० ते ३० ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राम माधवराव दाडगे (वय ४९, रा. गोल्डन सिटी, लोहा) यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील कपाटातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पोस्टे लोहा गुरनं. ३१०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता-२०२३ मधील कलम ३३१(४), ३०५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि. पांचाळ करीत आहेत.
