हदगाव (प्रतिनिधी) – विडाई पाणी फिल्टर दुकानात घुसून खंजरचा धाक दाखवत काऊंटरमधील १ लाख ७ हजार रुपयांची रोकड जबरीने चोरून नेल्याची घटना २८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हदगाव तालुक्यातील उमरी (ज) येथे घडली. फिर्यादी किशनराव गुट्टेवाड (वय ४२, रा. पाथरड, ता. हदगाव) यांच्या तक्रारीनुसार, राजू मुनेश्वर, शिल्पा राजू मुनेश्वर, नागेश मुनेश्वर, रत्नाकर मुनेश्वर, ललित रत्नाकर मुनेश्वर (सर्व रा. बोरगाव, ता. हिमायतनगर), मारोती गायकेवाड, साईनाथ मारोती गायकेवाड व कमलाबाई गायकेवाड (सर्व रा. हदगाव) यांनी दुकानात प्रवेश केला. त्यानंतर खंजरचा धाक दाखवून काऊंटरमधील १ लाख ७ हजार रुपयांची रोकड जबरीने घेऊन गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १५६/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३१०(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत Kanthak Suryatal Post Views: 1,009 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडमध्ये चोरीच्या तीन घटना; २ लाख ८२ हजारांचा ऐवज लंपास रस्त्यातील विटांवरून तरुणाला बेदम मारहाण; आठ जणांविरुद्ध गुन्हा