नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. याच मोहिमेअंतर्गत सोनेखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध पोलिसांच्या पथकाने धाड टाकून तब्बल १२ जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन आणि मोटारसायकली असा एकूण ३ लाख ४५ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अत्यंत नामांकित असे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे हे आहेत. पण डीआयजी पथकाने तेथे जुगार पकडला आहे. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांवर प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांच्या कार्यालयातील अधिकारी व अंमलदारांचे एक पथक नांदेड जिल्ह्यात रवाना करण्यात आले. या पथकाने १६ ऑगस्ट २०२६ रोजी सोनेखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे किकळा गावातील सोळार प्लॉटच्या पाठीमागील शेतातील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान जुगार खेळणाऱ्या व्यक्तींविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. घटनास्थळावरून ५० हजार ८० रुपये रोख, पाच मोबाईल फोन आणि चार मोटारसायकली असा एकूण ३ लाख ४५ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणात एकूण १२ इसमांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी सोनेखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९९/२०२६, कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोनेखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोहेकॉ वामन नागरगोजे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस अंमलदार प्रदीप खानसाळे, गणेश राठोड, संदीप वाघाडे आणि गजानन उबरे यांनी सहभाग घेतला. पथकाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित केले आहे. दरम्यान, अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचावी यासाठी नांदेड परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाकडून खबर हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. ९१५०१००१०० या मोबाईल क्रमांकावर नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे अवैध धंद्यांविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. सोनखेड मध्ये डीआयजी पथकाने पकडलेल्या जुगाऱ्यांची नावे संतोष टरके ,खुशालराव, सुधाकर शंकर टरके, साईनाथ उत्तम शंकपाळे,चक्रधर पुयड, विश्वनाथ संजय टरके, दत्ता कोकणे,धोंडीबा घुमाळ,साईनाथ दयानंद टरके,संतोष खैरे, दिंगाबर टरके अशी आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,080 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation हिमायतनगर पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; सुमारे २.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेडमध्ये अवैध शस्त्रांविरोधात पोलिसांची धडक कारवाई; चार जणांवर गुन्हे दाखल