नांदेड (प्रतिनिधी) : फिर्यादीस अवैध रेती वाहतूक करताना जप्त केलेले टेम्पो वाहन सोडून देण्याची मागणी करत धक्काबुक्की व धमकी देत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा आठच्या सुमारास नांदेड येथील तख्त सचखंड गुरुद्वारा गेट क्रमांक १ परिसरात हा प्रकार घडला. जयमलसिंग उर्फ गंगा हरबक्षसिंग धालीवाल (वय २५, रा. अबचलनगर, नांदेड) याने फिर्यादी अवैध रेती वाहतूक करताना जप्त केलेले टेम्पो वाहन सोडून देण्याची मागणी केली. यावेळी त्याने धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार बलवंतसिंग सुखविरसिंग संधू यांच्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०९/२०२६ नोंद करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १३२, २९६, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि दुरपडे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 632 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडमध्ये दोन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा; १.५ लाखांचा मुद्देमाल जप्त हिमायतनगर पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; सुमारे २.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त