नांदेड (प्रतिनिधी)- जन्म-मृत्यू प्रमाणपत्रातील नावात दुरुस्ती करण्याच्या नावाखाली राज्यभरात गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी (दि. 21) नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधताना केला. या प्रकरणाची गेल्या 3 वर्षापासून आपण चौकशी, एफआयआर दाखल करणे आणि बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी राज्यभर पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. नावात सुधारणा करण्याच्या प्रक्रियेत यापुढे गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी शासनाकडून नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. ऑनलाइन कोडच्या माध्यमातून जन्म-मृत्यू प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची कार्यप्रणाली सुरू करण्यात येणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. नांदेड-वाघाळा महानगरपालिकेत गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत नावात सुधारणा करण्याच्या कारणावरून तब्बल 11 हजार जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे देण्यात आल्याची माहिती समोर आली असून, या प्रमाणपत्रांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने मान्य केल्याचा दावा सोमय्या यांनी केला. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीकडे आता लक्ष लागले आहे. पत्रकारांनी नांदेड महापालिकेत भाजपची सत्ता असून 2 खासदार असतानाही या प्रकरणासाठी तुम्हालाच नांदेडला का यावे लागते? असा प्रश्न सोमय्या यांना विचारला. त्यावर, ’मला मोठं करत आहात की त्यांना लहान करत आहात?’, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. जन्म-मृत्यू प्रमाणपत्राच्या या विषयाची जवाबदारी आपण स्वीकारली असून, त्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून राज्यभर पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या तीन वर्षांत जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांशी संबंधित प्रकरणांमध्ये राज्यभरात 60 एफआयआर दाखल करण्यात आले असून, सुमारे 5 लाख जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याचा दावा सोमय्या यांनी केला. या प्रक्रियेला पुढेही वेग देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्याची कार्यप्रणाली महाराष्ट्रात अधिक प्रभावी आणि पारदर्शक राहील, असा विश्वासही सोमय्या यांनी व्यक्त केला. नांदेड महापालिकेतील 11 हजार प्रमाणपत्रांच्या चौकशीमुळे नावात दुरुस्तीच्या प्रक्रियेत नेमके काय घडले, याची माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. 25 नांदेडमधील जवळपास मतदारांची नावे वगळली गेली आहेत, अशी प्राथमिक माहिती पुढे आली आ-हे. काही वीएलओंनी घरी बसून काम केले, खोटा अहवाल तयार केला यामुळे मतदारांची नावे यादीतून वगळली गेली आहेत. यात दोन बीएलओंना निलंबित करण्यात आले आहे. याबाबतची चौकशी करण्याची मागणी आपण जिल्हाधिकार्यांकडे केली आहे, असे सोमय्या यांनी यावेळी सांगीतले. Kanthak Suryatal Post Views: 118 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी ऐकून घेतल्या नागरिकांच्या तक्रारी फटाका ग्राउंड येथे अनोळखी पुरुषाची गळफास घेऊन आत्महत्या; वजीराबाद पोलिसांचे ओळख पटवण्याचे आवाहन