नांदेड – पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी, दिनांक 1 ते 31 ऑगस्ट, 2026 दरम्यान, नांदेड परिक्षेत्रात अवैध दारू, गुटखा, मटका, जुगार, अंमली पदार्थ, घातक शस्त्रे इत्यादी विरोधी निर्मूलन मोहिम उघडली आहे. मोहिमे अंतर्गत, दिनांक 01 ते 15 ऑगस्ट, 2026 दरम्यान संपलेल्या पंधरवाडयात, नांदेड परिक्षेत्रात, गुटखा व्यावसायिकांविरुद्ध कलम 123 भारतीय न्याय संहिते अंतर्गत (18), महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत (172), महाराष्ट्र दारुबंदी कायदयान्वये (527), शस्त्र अधिनियमाअन्वये (26), तर इतर अधिनियमाखाली (110), अशा एकूण (853) कारवाया करुन (1315) इसमांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात निष्पन्न झालेल्या आरोपीतांकडून 7,97,61,724/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परिक्षेत्रातील विविध घटकांनी अवैध व्यवसाय निर्मुलन-2 मोहिमेमध्ये केलेल्या कारवाया पुढील प्रमाणे : जिल्हा गुटखा मटका/जुगार दारु शस्त्र अधिनियम इतर केसेस गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या नांदेड 9 16,53,418 14 47 28,19,005 239 126 8,34,805 132 14 14,70,150 28 46 3,83,49,796 71 परभणी 4 15,22,682 13 42 38,29,695 126 151 16,86,641 134 2 10,31,500 3 13 1,02,72,209 18 हिंगोली 2 92,308 2 35 4,98,595 80 118 7,68,070 119 6 24,200 6 26 54,08,405 28 लातूर 3 2,35,218 4 48 44,56,541 121 132 4,09,080 139 4 2,02,000 7 25 41,97,406 31 एकुण 18 35,03,626 33 172 1,16,03,836 566 527 36,98,596 524 26 27,27,850 44 110 5,82,27,816 148 परिक्षेत्रात सुरू असलेली अवैध व्यवसाय निर्मूलन मोहीम-2 ही पुढील पंधरावड्यात आणखी व्यापकपणे राबविण्यात येणार आहे. ‘खबरहेल्पलाइन वरुन माहिती द्या : अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलीसांना पोहोचविता यावी, या दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली ‘खबर‘ नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, सदर हेल्पलाइन वरून नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयापर्यंत पोहचवावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 759 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation संसदेत महिनाभर मौन, बाहेर येताच फक्त काँग्रेसवर हल्ला; गृहमंत्री अमित शाह यांच्या निवडक भूमिकेचे विश्लेषण न्यायालयाच्या लिपिक परीक्षेत गैरसोयींचा आरोप; विद्यार्थ्यांकडून परीक्षा पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह