नांदेड (प्रतिनिधी) – भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या दीर्घकालीन, उल्लेखनीय व निष्कलंक सेवेला गौरविण्यात आले आहे. पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांना अतिउत्कृष्ट सेवा पदक तसेच उत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले असून, या सन्मानाबद्दल सर्व पदकप्राप्त अधिकारी व अंमलदारांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनाही अतिउत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रप्रकाश गायकवाड यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. अतिउत्कृष्ट सेवा पदक विठ्ठल श्रीमंतराव खोमणे — पोलीस उपनिरीक्षक, जिल्हा विशेष शाखा गंगाराम हनमंतराव जाधव — HC/2264, स्थानिक गुन्हे शाखा उत्कृष्ट सेवा पदक राजेंद्र राजलिंग सिटीकर — HC/1242, पोलीस नियंत्रण कक्ष दिपक राजाराम पवार — HC/1806, पोलीस नियंत्रण कक्ष दत्ता रामचंद्र सोनुले — HC/1324, पोलीस मुख्यालय दिगांबर किशनराव मुसळे — HC/2357, पोलीस स्टेशन वजीराबाद गजानन बळीराम कदम — HC/784, पोलीस स्टेशन वजीराबाद संतोष परसराम वाघ — HC/144, दहशतवाद विरोधी पथक सतीश दत्तात्रय मुधोळकर — HC/33, दहशतवाद विरोधी पथक माधव नारायण येईलवाड — PC/3044, पोलीस स्टेशन सोनखेड महेश दुर्गय्या बुडगु — PC/2668, स्थानिक गुन्हे शाखा दीर्घकाळ प्रामाणिकपणे, कर्तव्यनिष्ठेने आणि समर्पित भावनेने सेवा बजावणाऱ्या या अधिकारी व अंमलदारांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने केलेला हा सन्मान नांदेड जिल्हा पोलीस दलासाठी अभिमानाची बाब आहे. सर्व पदकप्राप्त अधिकारी व अंमलदारांचे वास्तव न्यूज लाईव्हच्यावतीने हार्दिक अभिनंदन! त्यांच्या पुढील सेवाकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. Kanthak Suryatal Post Views: 1,169 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे धाडस विरुद्ध बार कौन्सिलचे दुस्साहस: लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी! आपला गणवेश हा अधिकारापेक्षा मोठी जबाबदारी – डॉ.नीलाभ रोहन