अर्धापूर (प्रतिनिधी) – अर्धापूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या नावाखाली सुरू असलेला खंडणीचा धंदा, महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि शासकीय गोपनीय माहिती लीक करण्याच्या धक्कादायक प्रकाराचा अहवाल समोर आल्याने जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ता शेख जाकीर पि. शेख समीर आणि अर्धापूर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी म.पो.शि. २९५४ अश्विनी गोडबोले यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. खंडणी आणि ब्लॅकमेलिंगचा अजब प्रकार नाफे काझी अमीनोद्दीन यांनी १४ ऑगस्ट २०२६ रोजी पोलीस उप अधीक्षक नांदेड ग्रामीण आणि पोलीस निरीक्षक अर्धापूर यांच्या कडे दिलेल्या तक्रारीनुसार शेख जाकीर हा शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज करून किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) खोट्या तक्रारी करून त्यांना जाळ्यात ओढत असे. तक्रार मागे घेण्यासाठी तो संबंधित अधिकाऱ्यांकडून मोठ्या रकमेची खंडणी मागत असे. खंडणी मिळाली तर तो तक्रार मागे घेण्याचे पत्र देत असे, मात्र पैसे न मिळाल्यास वरिष्ठांकडे खोटा दबाव निर्माण करून छळ करत असल्याचा उल्लेख पोलीस अहवालात आहे. ला.प्र.वि. नांदेड येथील तत्कालीन पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्याविरुद्ध देखील त्याने असाच तक्रार अर्ज केला होता आणि तो मागे घेण्यासाठी खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. पोलीस दलातील गोपनीय माहितीची गळती या संपूर्ण प्रकरणात महिला पोलीस कर्मचारी अश्विनी गोडबोले हिची भूमिका संशयास्पद असून, तिचे शेख जाकीरसोबत अनैतिक संबंध असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अश्विनी गोडबोले ही पोलीस दलातील अत्यंत गोपनीय माहिती, बदल्यांचे आदेश आणि अंतर्गत अहवाल शेख जाकीरला पुरवत असे. या माहितीचा वापर करून जाकीर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल करत असे, ज्यामुळे पोलीस खात्याच्या कामकाजात बेकायदेशीर हस्तक्षेप होत होता. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न तक्रारीनुसार, शेख जाकीर आणि त्याचे भाऊ केवळ वैयक्तिक फायद्यासाठीच नव्हे, तर शहरात धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करण्याचे देखील प्रयत्न करत आहेत. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या एका किरकोळ अपघाताला जातीय रंग देऊन हिंदू-मुस्लिम वाद भासवण्याचा प्रयत्न त्याने केला. तसेच कामठा येथील खंडोबा यात्रेतील किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या दंगलीत करण्यासाठी त्याने वरिष्ठांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता, असेही स्टेशन डायरीतील नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. पोलीस अंगरक्षक तात्काळ काढावा या अर्जात मागणी करण्यात आली आहे की,शेख जाकीर शेख सगीरला देण्यात आलेल्या पोलीस अंगरक्षक (गनर) सोबत घेऊन शेख जाकीरने नांदेड शहर आणि जिल्हाभर दहशत माजवली आहे. त्यामुळे जनता,सार्वजनिक सेवा देणारे असंख्य लोक त्रासलेले आहेत.म्हणून तो गनर तात्काळ काढावा. तो गनर अनेक वर्षांपासुन त्याचाच गनर का आहे,असा प्रश्न उपस्थित केला आहे. महिला कर्मचाऱ्यांचे शोषण शेख जाकीर याच्यावर यापूर्वीच वजीराबाद पोलीस ठाण्यात कलम ३५४ अआणि ५०९ अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. तो अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे शारीरिक आणि मानसिक शोषण करून त्यांना दबावात ठेवत असल्याची बाब पोलीस निरीक्षकांच्या कसूरी अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे. तात्काळ कारवाईची मागणी या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता, शेख जाकीरला देण्यात आलेली पोलीस अंगरक्षक तात्काळ काढून घेण्यात यावी आणि त्याच्यावर तसेच त्याला मदत करणाऱ्या अश्विनी गोडबोले यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नाफे काझी अमिनोददिन यांनी तक्रार अर्जाद्वारे केली आहे. अन्यथा या प्रकरणी न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही देण्यात आला आहे.या सर्व प्रकारामुळे सामान्य नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबद्दल चुकीचा संदेश जात असून, पोलीस उप अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Kanthak Suryatal Post Views: 2,131 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सुखबीर बादल यांच्या दिशेने जीवघेणा वार; संतोष केंद्रेंची झेप ठरली जीवनरक्षक;आरोपी वकील पोलीस कोठडीत लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे धाडस विरुद्ध बार कौन्सिलचे दुस्साहस: लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी!