नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका डॉक्टरच्या भाड्याच्या घरातून ८ लाख १२ हजार रुपयांची रोकड चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.इतवारा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने काही तासातच आरोपी जेरबंद करून चोरी गेलेल्या रकमेतील सर्व १०० टक्के रक्कम जप्त केली आहे. नेमकी घटना काय? फिर्यादी डॉ. शेख शहबाज शेख जाफर (वय ४०, रा. नौमानिया कॉलनी, चैतन्य नगर, तरोडा बु.) यांचे मदीना नगर, देगलूर नाका येथे भाड्याचे घर आहे. डॉक्टरांनी त्यांच्या वैद्यकीय व्यवसायातून आणि अपघात विम्यातून मिळालेली एकूण ८,१२,०००/- रुपये रोख रक्कम एका बॅगेत भरून पलंगाच्या बॉक्समध्ये ठेवली होती. २४ जुलै २०२६ रोजी रात्री ९:०० वाजेच्या सुमारास आरोपींनी संगनमत करून ही रक्कम चोरून नेली पाच जणांवर गुन्हा दाखल: या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून इतवारा पोलिसांनी खालील पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०६ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे: १) पिराजी बाळू वाघमारे (वय ५१) २) सुनील बाबूराव रपणवाड (वय २६) ३) सुनील चिमणाजी वाघमारे (वय २४) ४) साहेबराव पिराजी वाघमारे (वय २८) ५) तनुष्क गणपत मेटकर (वय १९) हे सर्व आरोपी मजूर असून ते नांदेडमधील चिखलवाडी आणि मित्र नगर भागातील रहिवासी आहेत. पोलीस तपास: या प्रकरणाची नोंद २९ जुलै २०२६ रोजी पोलीस ठाण्यात करण्यात आली. इतवारा उप विभागाचे पोलीस उप अधीक्षक प्रशांत शिंदे,पोलीस निरीक्षक रामेश्वर भोगुजी खनाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रवीण आगलावे पोलीस अंमलदार रेवणनाथ कोळनूरे,साहेबराव जगताप,बंडू कलंदर,शेख इजरायल,मारोती गीते, हरप्रीतसिंघ सुखई,शेख शबाना यांनी आरोपीना काही तासातच ताब्यात घेतले आहे. त्यामुळे चोरी केलेली रक्कमपूर्ण पणे १०० टक्के जप्त झाली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी इतवारा पोलिसांचे कौतुक केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,500 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation हिंसेचे बौद्धिक समर्थन आणि लोकशाहीचा गळाघोट: टीजी मोहनदास या विकृतीचा पंचनामा पालतू मीडिया की गोदी मीडिया? प्रियांका गांधींच्या एका विधानाने दिल्लीत मोठा भूकंप!