घरफोडीत दीड लाखांहून अधिक किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास भोकर (प्रतिनिधी) – तालुक्यातील महावीरनगर येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत तब्बल १ लाख ६६ हजार ८० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना २७ जुलै रोजी सायंकाळी ६.३० ते ७.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी साहेबराव गोमाजी बोरकर (वय ६०, रा. महावीरनगर, ता. भोकर) यांनी भोकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून कपाटातील दागिने चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार झाडे करीत आहेत. एमआयडीसी परिसरातून चेकर्ड प्लेट चोरी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी वजिराबाद परिसरातील जय कॉर्प लिमिटेड कंपनीतून ८ हजार रुपये किमतीच्या चार चेकर्ड प्लेट अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना २७ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी गड्डम पुरुषोत्तम रेड्डी (वय ६३, रा. नांदेड) यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा क्रमांक ९१५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार सावनकर करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 711 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड शहरात मोबाईल हिसकावण्याच्या दोन घटना; घरफोडीत अडीच लाखांचा ऐवज लंपास अनुदानित युरिया खताची अवैध वाहतूक; धर्माबाद पोलिसांची दोन कारवाया, १३५ बॅग जप्त