कंधार (प्रतिनिधी)- कंधार तालुक्यातील उस्माननगर येथे अज्ञात चोरट्याने किराणा दुकानाचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करत रोकड व साहित्याची चोरी केल्याची घटना ७ जुलै रोजी पहाटे घडली. या प्रकरणी उस्माननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्माननगर येथील फिर्यादी संजय राजाभाऊ उतरवार (वय ५५) यांच्या किराणा दुकानाचे कुलूप तोडून आरोपी धन्या उर्फ धनंजय गुणाजी घोरबांड (रा. उस्माननगर, ता. कंधार) याने दुकानात प्रवेश केला. यावेळी दुकानातील ७ हजार रुपयांची रोकड चोरून नेली, तसेच सुमारे ५ हजार रुपयांच्या काचेचे नुकसान करून दुकानाची तोडफोड केली. या घटनेप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून उस्माननगर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३८/२०२६ दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ३०५, ३३१(४) व ३२४(४) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार कल्लेवार हे करीत आहेत Kanthak Suryatal Post Views: 957 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation किनवटमध्ये बनावट तंबाखूजन्य पदार्थ निर्मिती अड्ड्यावर छापा; ₹५१,४२० चा मुद्देमाल जप्त अर्धापूर पोलिसांची अवैध गुटखा विक्रेत्यांवर धडक कारवाई; दोन जणांविरुद्ध गुन्हे दाखल