नांदेड पोलीस परिक्षेत्रात अवैध व्यवसायावर कारवाईचा भडिमार; ५६ गुन्हे, १.२३ कोटींचा मुद्देमाल जप्त

नांदेड(प्रतिनिधी) – नांदेड पोलीस परिक्षेत्रात १ ते ३१ मे २०२६ दरम्यान सुरू असलेल्या अवैध व्यवसाय विरोधी मोहिमेंतर्गत १९ व्या दिवशी मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ५६ गुन्हे दाखल करून ७१ इसमांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, १ कोटी २३ लाख ७३ हजार ४९५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

लातूर जिल्ह्यातील गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत १ लाख २ हजार ९२० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याशिवाय, मटका व जुगार खेळणाऱ्या १८ इसमांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये ८ गुन्हे दाखल करून ४३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध दारू विक्रीप्रकरणी ३३ आरोपींविरुद्ध ३३ गुन्हे दाखल करून ७४ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. अवैध वाळू उपसाप्रकरणी ६ आरोपींविरुद्ध ३ गुन्हे दाखल करून १ कोटी १६ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शस्त्र अधिनियमांतर्गत ३, कोटपा अन्वये ७ तर इतर कायद्यांखाली एकूण ५६ कारवाया नोंदविण्यात आल्या. नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नागरिकांना ‘खबर’ हेल्पलाईनचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी ९१ ५० १०० १०० या मोबाईल क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअपद्वारे अवैध व्यवसायांची माहिती देता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!