नांदेड (प्रतिनिधी -नांदेड एज्युकेशन सोसायटी संचालित पीपल्स महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य जयवंत येवतीकर यांचे मंगळवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 86 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. सोमवारी हृदयविकाराचा त्रास जाणवल्याने त्यांना डॉ.काब्दे यांच्या नारायणा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र मंगळवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या पार्थिवावर गुरुवार, दि.7 मे रोजी सकाळी 9 वाजता शांतीधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या पीपल्स महाविद्यालयात सुरुवातीच्या काळात त्यांनी प्राध्यापक म्हणून कार्य सुरू केले. पुढे प्राचार्य पदापर्यंत त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावली. नांदेड येथे नव्याने सुरू झालेल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रारंभीच्या शैक्षणिक कार्यकाळात तत्कालीन कुलगुरू जनार्दन वाघमारे यांनी त्यांच्यावर परीक्षा विभाग प्रमुखांची जबाबदारी सोपविली होती.शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा मोठा ठसा उमटला असून त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या निधनाची वार्ता समजताच माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील, सहसचिव अॅड. प्रदीप नागापूरकर तसेच चिरंजीलाल दागडिया यांनी येवतीकर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन व्यक्त केले. Kanthak Suryatal Post Views: 527 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation एप्रिल महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांतच लोकांनी बँकांमधून तब्बल ६१० अब्ज भाजपाने काँग्रेसची प्रतिमा मुस्लिम धार्जिणा किंवा मुस्लिम लीग सारखा पक्ष म्हणून करण्यात आसाम मध्ये यश मिळवले