नांदेड (प्रतिनिधी) – शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यातील तीन आरोपींपैकी दोघांनी पोलिसांच्या नजरेतून पळ काढल्याची घटना समोर आली असून त्यापैकी दोघांनाही पुन्हा अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासासाठी तीन आरोपींना हस्तांतरण वारंटवर ताब्यात घेतले होते. न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर या आरोपींची गुन्हे शोध पथकाकडून चौकशी सुरू होती. हा प्रकार काल रात्रीचा आहे. दरम्यान, पोलिसांची नजर चुकवत दोन आरोपींनी खिडकीतून उड्या मारून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ धावपळ करत शोधमोहीम सुरू केली. पळून गेलेल्या आरोपींपैकी एकाला लगेचच पकडण्यात यश आले, तर दुसरा आरोपी फरार झाला होता. मात्र, शिवाजीनगर पोलिसांनी सतत शोध घेत अखेर ५ मे रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास फरार आरोपी सोहेल अब्दुल सत्तार (रा. जवाहरनगर, नांदेड) याला पुन्हा अटक केली.कायदेशीर ताब्यातून पळून गेलेल्या आरोपीला अल्पावधीत शोधून पुन्हा अटक केल्यामुळे शिवाजीनगर पोलिसांच्या तत्परतेचे आणि कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. संबंधित बातमी …. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून आरोपीचा थरारक पळ; एकास पकडण्यात यश, दुसरे दोन फरार Kanthak Suryatal Post Views: 2,062 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून आरोपीचा थरारक पळ; एकास पकडण्यात यश, दुसरे दोन फरार खंडेलवाल शब्द उच्चारता येत नाही त्यांनी खंडेलवाल बद्दल बोलावे काय सामाजिक कार्यकर्ते की सोशल मीडियाचे कलाकार?