भदंत पंय्याबोधी थेरो यांचे थायलंड येथे प्रतिपादन; वसुंधरा दिनानिमित्त एक लाख भिक्षूंची उपस्थिती नांदेड- वॉट फ्रा धम्मकायाची भविष्यातील एका आदर्श समाजाची दूरदृष्टी आहे. वॉट फ्रा धम्मकाया हे विशेषतः मनाला शांती मिळवण्याचे ध्यानावर भर देण्यासाठी ओळखले जाते. लुंग पोर धम्मजायो यांच्या शिकवणीतून, वॉट फ्रा धम्मकायाने आपल्या शिकवणीसाठी अधिक आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन विकसित करण्यास सुरुवात केली, आणि बौद्ध नसलेल्या देशांमध्ये ध्यान हे सर्व धर्मांच्या किंवा कोणताही धर्म न मानणाऱ्यांसाठी योग्य असे धार्मिकदृष्ट्या तटस्थ तंत्र म्हणून शिकवले, असे प्रतिपादन येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष धम्मगुरु संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले. ते थायलंड येथील धम्मकाया सेंटर येथे वसुंधरा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या सोहळ्यासाठी भारतातून भदंत पंय्याबोधी थेरो यांना निमंत्रण आले होते. यावेळी जगभरातील एक लाख भिख्खू आणि नऊ लक्ष बौद्ध उपासक उपासिकांची उपस्थिती होती. वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट्स आणि वर्ल्ड बुद्धिस्ट संघ फोरमच्या आयोजन समितीच्या वतीने, जगप्रसिद्ध वाट फ्रा धम्मकाया महाविहार, थायलंड येथील मुख्य अधिष्ठाता, परम पूज्य लुआंग फो धम्मजयो भिक्खू यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त, तसेच पृथ्वी दिनाच्या निमित्ताने ‘आवर पाॅवर आवर प्लॅनेट’ या उदात्त विषयाखाली एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंय्याबोधी पुढे बोलताना म्हणाले की, हा महत्त्वपूर्ण सोहळा जागतिक बौद्ध समुदायाला एकत्र आणून अंतःशांती, पर्यावरण जागरूकता आणि आपल्या पृथ्वीच्या कल्याणासाठी सामूहिक जबाबदारी यांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित केला आहे. तसेच, परम पूज्य लुआंग फो धम्मजयो भिक्खू यांनी बुद्धांच्या शिकवणींचा प्रसार, ध्यान साधनेचा प्रचार आणि नैतिक व मानवतावादी मूल्यांच्या वृद्धीसाठी केलेल्या अमूल्य योगदानाला आदरांजली अर्पण करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. यावेळी थायलंड येथील जगविख्यात धम्म काया मेडिटेशन सेंटरचे द्वितीय प्रमुख पूज्य भदंत दत्ताजीओ यांनी तथागत भगवान बुद्धांची मूर्ती भदंत पंय्याबोधी थेरो यांना दान दिली. यावेळी विविध धार्मिक विधी संपन्न झाल्या. Kanthak Suryatal Post Views: 652 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या जिल्हा समन्वयकपदी राम तरटे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी पातळी वाॅटरबेल!