नांदेड (प्रतिनिधी)- अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, जिल्हा नांदेड यांच्या वतीने भगवान श्री परशुराम जयंती निमित्त परशुराम तेजोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दि. १७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ ते १० वाजता कुशुम सभागृह, नांदेड येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाचा मुख्य विषय प्रखर हिंदुत्व असा असून, यावर प्रख्यात वक्ते शरदजी पोंक्षे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन कॅबिनेट मंत्री दर्जाचे अध्यक्ष, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशीषजी दामले यांच्या हस्ते होणार आहे.कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून अड़.वेंकटेश पाटणूरकर (श्रीराम सेवक) व अड़. यदुपत अर्धापुरकर (ब्रह्म भूषण) यांची उपस्थिती लाभणार आहे. या निमित्ताने सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाचे संयोजक निखिलभाऊ लातूरकर (प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ – महाराष्ट्र राज्य) असून, विविध मान्यवरांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. Kanthak Suryatal Post Views: 541 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation इस्लामपुरा भागातील चार जीवांच्या मृत्यूचा जबाबदार कोण ? वाढदिवसाला हारतुरे नकोत, गोमातेच्या चाऱ्यासाठी मदत करा! गो सेवक बिरबल यादव यांचे समाजहिताचे आवाहन; अनोख्या उपक्रमाची चर्चा