सोनू कल्याणकरच्या मारेकऱ्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी;एकाची  पोलीस कोठडी मागितलीच नाही 

नांदेड (प्रतिनिधी)- दिनांक ६ एप्रिल रोजी पहाटे सूर्योदयापूर्वी सुमारे सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास श्रीनगर भागातील कुमार ड्रेसेसच्या विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर झालेल्या सोनू कल्याणकर या तरुणाच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चार आरोपींपैकी तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून चौथ्या आरोपीस न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

मृत तरुणाचे नाव अनिकेत उर्फ सोनू अशोक कल्याणकर (वय ३५) असे असून त्याचे वडील अशोक माधवराव कल्याणकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते पत्नी व मुलगा सोनू यांच्यासह श्रीनगर परिसरात वास्तव्यास आहेत.घटनेच्या दिवशी ६ एप्रिल रोजी सोनूचा मित्र घाबरलेल्या अवस्थेत घरी येऊन काही जणांनी सोनूवर हल्ला केल्याची माहिती दिली. जखमी सोनूला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार हा प्रकार प्रेमसंबंधातून घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सोनूचे चंद्रविजय मंगनाळे यांच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. या कारणामुळे संबंधित मुलीचे ठरलेले लग्न मोडल्याचा राग मनात धरून आरोपींनी कट रचून खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे.घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हालचाल करत भाग्यनगर पोलीस, वजिराबाद पोलीस,स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्त कारवाईत चार आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत 

  • चंद्रविजय हौसाजीराव मंगनाळे (वय ५६, रा. नाईकनगर, नांदेड)
  • पियुष उर्फ प्रसाद उर्फ ऋषी शिवाजी शिंदे (रा. कौठा, नांदेड)
  • मधुसूदन उर्फ कृष्णा माधव जोगदंड (वय १९, रा. वजीराबाद, नांदेड)
  • रवी उर्फ रोहित राजेश लोट (वय २८, रा. गोवर्धनघाट परिसर, नांदेड)

सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुपमा केंद्रे,पोलीस उप निरीक्षक संकेत सौराते  तपास पथकातील पोलीस अंमलदार, गजानन किडे, नवनाथ गुट्टे, अदनान पठाण, राजू घुले, गंधपवाड आदींनी आरोपींना न्यायालयात हजर केले.

सरकारी वकिल ऍड.शेख सादिक यांनी पोलिसांच्या वतीने कोठडीची मागणी केली. बचाव पक्षाच्या वकिलांनी त्यास विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पियुष उर्फ प्रसाद शिंदे, मधुसूदन उर्फ कृष्णा जोगदंड आणि रवी उर्फ रोहित लोट या तिघांना १० एप्रिल २०२० पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून चौथा आरोपी चंद्रविजय हौसाजीराव मंगनाळे यास न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.पोलिसांच्या गोळीने जखमी आरोपी अंकुश गंधपवाड हा सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.

आजच्या पीसीआर यादीतील महत्वाची बाब अशी आहे की,अटक आरोपी मधील क्रमांक एक वर नाव असलेल्या चंद्रविजय हौसाजीराव मंगनाळे यास पोलीस कोठडी सुद्धा मागितल्याचे लिहिलेले नाही. तसेच त्यास न्यायालयीन कोठडीत पाठवा असे सुद्धा लिहिलेले नाही. फक्त तीन जणांना पोलीस कोठडी द्या असे लिहिलेले आहे.अशी जबरदस्त ही पोलीस कोठडीची यादी आहे. 

संबंधित बातमी ….

सोनू कल्याणकारच्या मारेकऱ्याच्या पायात यासाठी गोळी मारावी लागली 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!