राज्यात २५ आयएएस अधिकाऱ्यां​ना नवीन जबाबदारी 

जनगणना आयुक्तांच्या आदेशानंतर​ प्रशासनात व्यापक फेरबदल

नांदेड (प्रतिनिधी)- ​ महाराष्ट्र शासनाने जनगणना आयुक्तांच्या आदेशानंतर राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत मोठा बदल करत जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावरील तब्बल २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. २ एप्रिल २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये नवे प्रशासकीय नेतृत्व मिळाले आहे.​मागील आठवड्यात सुद्धा डझनभर आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व विविध विभागांमध्ये नव्या कार्यपद्धतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बदली व नियुक्त अधिकाऱ्यांची यादी

  1. जी. श्रीकांत – छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्त पदावरून जल जीवन मिशन, नवी मुंबई येथे मुख्य कार्यकारी अधिकारी.
  2. दिलीप स्वामी – जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर वरून महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला येथे व्यवस्थापकीय संचालक.
  3. वर्षा ठाकूर-घुगे – जिल्हाधिकारी लातूर वरून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई येथे संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी.
  4. दीपक सिंगला – अतिरिक्त आयुक्त पीएमआरडीए पुणे वरून मनरेगा आयुक्त, महाराष्ट्र (नागपूर).
  5. के. मंजुलेक्ष्मी – कोल्हापूर महापालिका आयुक्त वरून पीएमआरडीए पुणे येथे अतिरिक्त महापालिका आयुक्त.
  6. डॉ. राजेंद्र भरुड – प्रकल्प संचालक रुसा, उच्च व तंत्र शिक्षण विभाग मुंबई वरून कोल्हापूर महापालिका आयुक्त.
  7. डॉ. प्रविणकुमार देवरे – पशुसंवर्धन आयुक्त पुणे वरून बुलढाणा जिल्हाधिकारी.
  8. डॉ. भारत बस्तेवाड – मनरेगा आयुक्त नागपूर वरून लातूर जिल्हाधिकारी.
  9. वर्षा लड्डा – महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे वरून अमरावती महापालिका आयुक्त.
  10. अमोल येडगे – कोल्हापूर जिल्हाधिकारी वरून छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्त.
  11. डॉ. विजय राठोड – एमआयडीसी संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई वरून कोल्हापूर जिल्हाधिकारी.
  12. विनय गौडा जी.सी. – चंद्रपूर जिल्हाधिकारी वरून छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी.
  13. डॉ. किरण पाटील – बुलढाणा जिल्हाधिकारी वरून पशुसंवर्धन आयुक्त पुणे.
  14. डॉ. मंगेश गोंदावले – एमएआयडीसी व्यवस्थापकीय संचालक मुंबई वरून गोंदिया जिल्हाधिकारी.
  15. कुमार आशीर्वाद – सोलापूर जिल्हाधिकारी वरून नागपूर जिल्हाधिकारी.
  16. वसुमना पंत – नागपूर महापालिका अतिरिक्त आयुक्त वरून चंद्रपूर जिल्हाधिकारी.
  17. प्रजीत नायर – गोंदिया जिल्हाधिकारी वरून पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त.
  18. अंकित – छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वरून नागपूर महापालिका अतिरिक्त आयुक्त.
  19. कार्तिकेयन एस. – कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वरून सोलापूर जिल्हाधिकारी.
  20. संजिता मोहापात्रा – अमरावती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वरून सांगली-मिरज-कुपवाड महापालिका आयुक्त.
  21. मिन्नू पी. एम. – जालना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वरून छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी.
  22. सत्यम गांधी – सांगली-मिरज-कुपवाड महापालिका आयुक्त वरून अमरावती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी.
  23. जॅस्मिन – सहाय्यक जिल्हाधिकारी राजापूर (रत्नागिरी) वरून कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी.
  24. अंजली शर्मा – जालना महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती.
  25. कृष्णकांत कंवारिया – सहाय्यक जिल्हाधिकारी शहादा (नंदुरबार) वरून जालना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी.

प्रशासनात नव्या कार्यसंस्कृतीची अपेक्षा

राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये नवीन जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त नियुक्त झाल्यामुळे विकासकामे, नागरी सुविधा, ग्रामीण योजना तसेच पायाभूत प्रकल्पांना नव्याने गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी जनगणना प्रक्रिया, जल जीवन मिशन, मनरेगा आणि औद्योगिक विकास प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर ही बदली महत्त्वाची मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!