या निमित्ताने अनेकांना पहिल्यांदाच नितीन गडकरी यांच्या व्यावसायिक साम्राज्याबद्दल माहिती मिळत आहे. फोटोमध्ये दिसणारा तरुण म्हणजे तिशीतला दलित यूट्यूबर मुकेश मोहन साधं घर, उडालेल्या भिंतींचा रंग, अत्यंत साधी साधनसामग्री… आणि भिंतीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो. त्या फोटोमधून प्रेरणा घेत तो आपलं काम करत होता.
पण या सामान्य यूट्यूबरची एक स्टोरी इतकी खटकली की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट ५० कोटी रुपयांची मानहानी नोटीस पाठवली.प्रश्न असा आहे एका छोट्या यूट्यूबरमध्ये अशी कोणती ताकद होती की इतक्या मोठ्या नेत्याला नोटीस द्यावी लागली? मुकेश मोहनने आपल्या व्हिडिओमध्ये नागपूरमधील गडकरी कुटुंबाशी संबंधित कथित ॲग्रो बिझनेस नेटवर्कवर प्रश्न उपस्थित केले. एका कारवान मॅगझिन रिपोर्टच्या आधारे त्याने बीज कंपनी, ॲग्रो फूड इंडस्ट्रीज, सियाना ॲग्रो आणि रम्बल कंपनी यांच्यातील आर्थिक व व्यवस्थापकीय संबंध दाखवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे मानहानीचा दावा मॅगझिनवर नाही, तर यूट्यूबरवर करण्यात आला.

हीच खरी गंमत आहे.मीडिया हळूहळू नियंत्रित झाल्यानंतरही सोशल मीडियावर प्रश्न विचारण्याचं धाडस काही लोक दाखवत आहेत, आणि हीच भीती सत्ताधाऱ्यांना वाटू लागली आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. मुकेश मोहनने यापूर्वी गडकरींच्या इथेनॉल प्रचार मोहिमेबाबतही दावा केला होता की त्याला पेड कॅम्पेनसाठी संपर्क करण्यात आला होता. त्याने नकार दिल्यानंतर काही महिन्यांनी त्याच्यावर ५० कोटींची केस दाखल झाली असा आरोप त्याने केला आहे. घरामध्ये स्वतःच्या कांदा आणि लसूण खात नाहीत ते सुद्धा लोक या बिझनेस मध्ये आहेत आणि गडकरी या कंपनीचे असोसिएट आहे
त्याच्या व्हिडिओला अडीच ते तीन कोटी व्ह्यूज मिळाले, विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनीही तो शेअर केला. त्यानंतरच ही कारवाई झाली का? हा प्रश्न आता सार्वजनिक चर्चेत आहे.कारवान मॅगझीन ने केलेल्या खुलाशात कायदेशीर सांभाळ होता. पण मुकेश मोहन ने तो सांभाळला नाही. असो. रिपोर्टमध्ये थेट गडकरींची कंपनी असल्याचा दावा नसला तरी विविध संचालक, फायनान्सिंग नेटवर्क, व्यावसायिक संबंध आणि गडकरी कुटुंबातील सदस्यांचे अप्रत्यक्ष कनेक्शन दाखवण्यात आले होते. याच मुद्द्यांवरून राजकारण, धर्म आणि व्यवसाय यातील दुटप्पीपणा उघड करण्याचा प्रयत्न झाल्याचं म्हटलं जात आहे.

आज परिस्थिती अशी आहे की मोठ्या लीगल टीमसमोर एक सामान्य यूट्यूबर उभा आहे. पण नोटीस दिल्यानंतर उलट ही माहिती मर्यादित लोकांपासून लाखो लोकांपर्यंत पोहोचू लागली आहे. आंबेडकरी विचारसरणीतील अनेक नेत्यांनी मुकेश मोहनच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली.ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा मुकेश मोहनला फोन केला होता. आता पर्यंत बीफ बिजनेस मध्ये गडकरी कुटुंबीय आहेत हे काही लोकांना माहित होते.मोहनला ५० कोटीची नोटीस पाठवल्याने आत ही कमी लोकांना माहित असलेली बाब सार्वजानिक झाली आहे.
आता प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नाही…
सत्ता मोठी की प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य?
सत्य मांडणं गुन्हा आहे का?
की ही सोशल मीडिया युगातील नवीन “व्हिच हंटिंग”?
