’खरा भोंदू कोण?’

थाकथित आध्यात्मिक गुरु  खरात आणि त्याचे पाय धुणारी रूपाली चाकणकर या प्रकरणाने महाराष्ट्रातील सगळं समाज जीवन ढवळून निघाले . सगळ्या समाजाला जागृत होण्याइतपत कोणता महत्त्वाचा मुद्दा या घटनेत आहे? तर तो आहे लैंगिकता/ सेक्स .
* चिंपांजी माकडापासून उत्क्रांत झालेले आपण जिवंत राहावे आणि आपलेच जीन्स पुढे राहावेत यासाठी लैंगिकता ही मूलभूत प्रेरणा आहे असे डार्विन ने आपल्या ’ओरिजिन ऑफ स्पेशिज’ या ग्रंथात मांडले.
*सिग्मंड फ्रॉईड या शास्त्रज्ञाने तर हे दाखवून दिले की मानवी लैंगिकता ही आईच्या उदरात असल्यापासून बाळामध्ये जागृत असते.  तरीपण आपण सगळेच पुरुष आणि महिला या दोघांसारखे वागत नाही. का?
* कोणतीही आसक्ती  ही दुःखाचे मूळ कारण आहे असे म्हणून इतर अनेक इच्छा बरोबर  लैंगिकता टाळण्यासाठी बौद्ध तत्त्वज्ञानात मूलभूत मांडणी केलेली दिसते.
* वारकरी धर्माने देखील विकृत लैंगिकतेचा  धिक्कार केला.
* असे असले तरी चिंपांजी माकडाच्या सगळ्या मूलभूत प्रेरणा आजच्या मानवात असताना ते एकत्र जमल्यावर  माकडाच्या टोळी सारखे वर्तन का करत नाहीत? यावर युवा हरारे या आधुनिक इतिहासकाराचे म्हणणे असे की  उत्क्रांतीच्या प्रक्रियेत  मानवामध्ये सदविवेकबुद्धी, न्यायवृत्ति…. जागृत होत लैंगिकते प्रमाणे  जणूकामध्ये गेली. त्यातून लोकशाही सारख्या व्यवस्था जगभर पसरू लागल्या. भारतातही तेच झाले.
* परंतु काहींच्या दृष्टीने 2014 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. सनातनी ब्राह्मणी धर्माचा पुनर्जन्म झाला. त्या धर्मातील मूळ लैंगिक विचारांना पाठबळ मिळाले.
*सनातनी ब्राह्मणी धर्माने लैंगिकतेबद्दल कोणती नैतिक तत्वे धर्मग्रंथात मांडलेली आहेत ?  इंद्रदेव सह अनेक देव व्यभिचारी होते. अनेक ऋषी भानगडी बाज होते. याची वर्णने आमच्या धर्मग्रंथात आहेत. ती प्रकरणे इथे लिहायचे धाडस होत नाही इतकी ती विकृत आहेत. सनातनी धर्मानुसार लैंगिकतेत धुमाकूळ घालण्याचा अधिकार कोणाला होता? शक्तिशाली अधिकार असलेल्या व्यक्तीला. ऋग्वेदा नुसार ब्रम्हाच्या मुखातून जन्माला आल्याने ब्राह्मण हा सर्वश्रेष्ठ व शक्तिमान ठरविला गेला. तो सत्त्व गुणी भूतलावरील देव आहे.
*परशुराम नावाच्या शक्तिशाली ऋषीने क्षत्रियांचा 21 वेळा निपात केला आणि त्यांच्या विधवा स्त्रियांशी इतर शक्तिशाली ऋषींनी लैंगिक संबंध ठेवले. पैदास केली त्या ऋषींच्या नावाने त्या पिढ्यांना गोत्र देण्यात आले. आजही आम्ही ते गोत्र अभिमानाने सांगतो.
*क्षत्रियांचा निपात करणारा परशुराम हा खरा लढवय्या नसून एक लाकूडतोड्या होता हे अलीकडे त्यांच्याच मोहन नावाच्या विद्वान माणसाने जाहीर केलेले आहे. स्वतःला ऋषींची पिलावळ म्हणविणाऱ्यांनी आपली विकृती दाखवून दिली.
* बहुजनांच्या लग्नामध्ये “मम भार्या समर्पयामी” असे म्हणत आजही नवविवाहितेवर ब्राह्मण आपला पहिला अधिकार सांगतो .देवदासी, भामिनी, स्तन टॅक्स,अशा असंख्य प्रथा चालू ठेवून  सनातनी ब्राह्मणांनी विकृत लैंगिक प्रेरणा जिवंत ठेवण्याचा आणि भागविण्याचा प्रयत्न केला.
* महिलांचे शोषण करत राजकारण्यांना आपले मूत्र प्यायला भाग पाडण्या साठी त्यांच्या मदतीला कोण आले ? रूपाली ताई अशोक खरात याचे पाय धूत असताना  दाखवलेल्या फोटोमध्ये त्यांच्या पाठीमागे स्वामी समर्थांचा फोटो दिसतो. तो अगदी अलीकडचा देव आहे. आजच्या भटा ब्राह्मणांनी निर्माण केलेला.
* 2014 नंतर आलेल्या या सरकारचे लैंगिक आणि इतर सल्लागार कोण? रामभद्राचार्य! ते स्वतःला इतर ब्राह्मणापेक्षा उच्च व प्युअर ब्राह्मण समजतात. त्यांचं एक वक्तव्य वाचण्यात आलं की “पूर्वी ब्राह्मण ऋषी अरण्यात तप करीत असले तरी मंत्राने आपल्या पत्नीकडून मुलांना जन्म देत असत.” त्याच ऋषींची वंशावळ आजही मंत्र म्हणते मग ते अशाच प्रकारे मुले तयार करतात का?जगात असा एकही प्राणी नाही की मंत्राने आपल्या पिलांना जन्म घालतो. आमच्या हिंदू धर्मातील कनिष्ठ जातीतील स्रीया बद्ल यांची बदनामी करणारी वक्तव्य प्रसिद्ध आहेत. याच आधुनिक ऋषीला ज्ञानपीठ हा सन्मान देऊन पद्मविभूषण ही पदवी दिलेली आहे .
* “आमच्या आंब्याच्या बागेतील फळे खाऊन स्त्रियांना मुलगा होतो” हे सांगणारा मनोहर कुलकर्णी नावाचा आर्य ब्राह्मण हा या देवेंद्रचा गुरु आहे.
* नागपूरला बोलवून  धीरेंद्र शास्त्रीं नावाच्या भोंदू बाबाचा सत्कार याच देवेंद्रजीने केला होता.
*त्यानेच आपल्या शपथविधीला नरेंद्र महाराज नावाचा एक भोंदू महाराज बोलविला होता.
* ब्राह्मणी सनातनी धर्म की जय असे उघडपणे विधानसभेत म्हणत हा  या निवडणूक प्रक्रिये तून पुढे आलेला ढोंगी लोकशाहीवादी नेता आहे. आणि त्याचे नाव आहे देवेंद्र फडणवीस !
त्याने आपला भोंदूपणा विधानसभा, शिक्षण देणारे विद्यापीठ ,प्रशासन, खेळ, समाजकारण, राजकारण , वारकरी  कीर्तनकार,…., या सगळ्याच क्षेत्रात पसरविलेला आहे . आणि त्यांनी निर्माण केलेल्या वातावरणामुळे या भोंदू महाराजांचे प्रचंड मोठे पीक आलेले आहे .
विकृत वर्तन करणाऱ्या खराताच्या फोटो मागे स्वामींचा फोटो आहे. हा देवेंद्र व त्याच्या ब्रह्मवृंदाणे निर्माण केलेला आधुनिक देव आहे.
* आपण वारकरी सांप्रदायाचे आहोत असे सांगणाऱ्या चाकणकरांचा ” उत्तम व्यवहार” करायला सांगणाऱ्या तुकोबाचा किंवा “खळांची व्यंकटी   सांडो” सांगणाऱ्या माऊलीचा फोटो सोबत नाही. तो फोटो आहे ब्राह्मणी सनातली भोंदू ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या ” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” सांगणाऱ्या स्वामींचा. आणि त्या स्वामींच्या पाठीशी उभा आहे
देवेंद्र फडणवीस नावाचा भोंदू  राजकारणी ! एकटा नव्हे तर सनातनी  धर्माला मानणाऱ्या सर्व ब्रह्म वृंदांना सोबत घेऊन! * *तो आम्हा भोळसट ,मूळ निवासी, बहुजनांना  दिसत नाही . दिसला तरी काय करायचे ते समजत नाही.पण आमचा तुकोबा, ज्ञानोबा, बहिणाबाई,… आणि आमच्यासारखे असंख्य समर्थक हे एक दिवस त्याची असली सीडी अशीच बाहेर काढणार आहोत!
-सुरेश खोपडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!