शिवाजीनगरमध्ये घरफोडी; 1.35 लाखांचा मुद्देमाल लंपास

नांदेड (प्रतिनिधी)- दि. 21 मार्च 2026 रोजी सायंकाळी 4.30 ते 5.15 दरम्यान शिवाजीनगर परिसरातील तेहरानगर येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. या घटनेत घरातील सुमारे 50 हजार रुपयांची रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने तसेच मोबाईल असा एकूण 1 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला.

याप्रकरणी फिर्यादी रेखा संतोष धवळे (वय 42, रा. तेहरानगर, नांदेड) यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, अशा घटनांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!