नांदेड (प्रतिनिधी) – पाथरी शहरात सुरू असलेल्या जुगार व मटका बुकी अड्ड्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करत 13 आरोपींवर गुन्हे दाखल केले असून सुमारे 1.49 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विशेष पथकाने पाथरीतील विविध ठिकाणी छापे टाकले. 23 मार्च रोजी रशीद कॉलनी परिसरात एका शेडमध्ये सुरू असलेल्या तिरट जुगारावर कारवाई करत 8 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून 33,200 रुपयांची रोख रक्कम आणि 7 मोबाईल असा एकूण 83,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर नायब हॉटेलजवळील दुसऱ्या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने चालणाऱ्या ‘फन टार्गेट चक्र’ (बिंगो) जुगारावर छापा टाकून 5 आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत 36,600 रुपयांची रोख, एक मोबाईल, संगणक व इतर साहित्य असा 66,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही कारवायांमध्ये एकूण 69,800 रुपयांची रोख, 8 मोबाईल, संगणक व इतर साहित्य असा मिळून 1 लाख 49 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हे नोंदवण्यात आले असून पुढील तपास पाथरी पोलीस करत आहेत. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोहेकॉ प्रवीण खांदळे, संजीव जिंकाळवाड, गणेश धुमाळ, कमाजी गवळी आदींचा सहभाग होता. पथकाच्या कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी कौतुक केले आहे. दरम्यान, अवैध व्यवसायांविषयी माहिती देण्यासाठी पोलिसांनी ‘खबर’ हेल्पलाइन सुरू केली असून नागरिकांनी 9150100100 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,081 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शिवाजीनगरमध्ये घरफोडी; 1.35 लाखांचा मुद्देमाल लंपास अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणी बेंगलुरु शहरात शून्य क्रमांकाचा गुन्हा दाखल; तपासासाठी महाराष्ट्राकडे वर्ग