काल दुपारपासून आज पहाटेपर्यंत सलग मिसाईल हल्ल्यांची मालिका सुरू होती:
- UAE मध्ये 13 मिसाईल,
- कतारमध्ये 14 मिसाईल,
- बहरीनमधील अमेरिकन बेसवर हल्ला,
- तेल आणि गॅस प्रकल्पांवर थेट प्रहार.
कतारच्या गॅस संयंत्रावर झालेल्या हल्ल्यामुळे पुढील पाच वर्षांसाठी तब्बल 17% उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे ही केवळ स्थानिक नाही, तर जागतिक ऊर्जासंकटाची घंटा आहे.कारण आज झालेले नुकसान भरून पुन्हा आपले उत्पादन 17% टक्के वाढवण्यासाठी कतर 5 वर्ष लागणार आहेत.

रियाधमधील अमेरिकन तळांवरही हल्ले झाले. त्याच वेळी तेल अवीववर 15 क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. सेंट्रल इस्रायलमध्ये काल रात्री जे दृश्य दिसलं, ते जणू दिवाळीच्या आकाशा सारखं फरक इतकाच की इथे फटाके नव्हते, तर मृत्यू बरसवणारे बॉम्ब होते. काही क्षेपणास्त्रांमधून एकाच वेळी 80 छोटे बॉम्ब फुटत होते विनाशाची परिसीमा.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावरही विसंगती दिसत आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी स्पष्ट सांगितले की, हे आमचं युद्ध नाही. दुसरीकडे, अमेरिका आणि इस्रायलच्या विधानांमध्ये विरोधाभास स्पष्ट दिसतो.
इराणने हल्ल्याची रणनीती आखूनच पावलं उचलली:
- आधी ड्रोन हल्ल्यांनी संरक्षण यंत्रणा निष्क्रिय केली,
- त्यानंतर अचूक क्षेपणास्त्र हल्ले.
इराणी दाव्यानुसार त्यांनी अमेरिकेची काही लढाऊ विमाने आणि इंधन वाहतूक करणारी साधनंही पाडली आहेत. तसेच इस्रायलमधील हायफा रिफायनरीलाही आग लावण्यात आली.या सगळ्याचा थेट परिणाम तेलाच्या किंमतींमध्ये प्रचंड उसळी. दिवसात तेलाच्या बॅरलची किंमत 16 रुपयांनी वाढली आहे.
अरब राष्ट्रांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. काही देश म्हणत आहेत की इराणने लाल रेषा ओलांडली आहे, पण त्यांच्याकडे ठोस भूमिका घेण्याचं धैर्य नाही. अमेरिकेला त्यांच्या भूमी आणि आकाशाचा वापर थांबवण्याची हिंमतही ते दाखवू शकत नाहीत.
इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे:
“आमच्या ऊर्जा स्रोतांवर हल्ला झाला, तर आम्ही असा प्रत्युत्तर देऊ की जग कल्पनाही करू शकणार नाही.”
![]()
![]()
ऊर्जा तज्ञ सांगत आहेत की, या हल्ल्यांमुळे अरब देशांतील नुकसान भरून काढायला अनेक वर्षे लागतील. जग एका मोठ्या ऊर्जा तुटवड्याच्या उंबरठ्यावर उभं आहे. भारतासाठीही ही परिस्थिती गंभीर आहे कारण भारत मोठ्या प्रमाणात कतारकडून गॅस आयात करतो. आता त्यात 17% घट होणार असल्याने त्याचे परिणाम थेट जाणवणार.
या सगळ्यामागे मोठं धोरण दिसतं इराणला जमिनीवरच्या युद्धात ओढण्याचा प्रयत्न. पण जर तसं झालं, तर इराणची फौज, स्वयंसेवक आणि नागरिक पूर्ण ताकदीने उभे राहतील आणि मग हे युद्ध अधिक भयानक वळण घेईल.
दरम्यान, सामान्य नागरिकही या युद्धाचे बळी ठरत आहेत. लेबनॉनमध्ये एका पत्रकारावर हल्ला झाला, जिथे कोणतीही लष्करी हालचाल नव्हती. इराणचा दावा आहे की त्यांच्या मृतांपैकी 30% लहान मुले आहेत ही आकडेवारी युद्धाच्या क्रौर्याची साक्ष देते.
आज 21 दिवस उलटून गेले, तरी हे युद्ध थांबलेलं नाही. उलट इराण अधिक ठामपणे उभा आहे.जल डमरू मध्य अर्थात ज्याला होर्मुझची खाडी (Strait of Hormuz) म्हटले जाते, त्या अत्यंत महत्त्वाच्या सागरी मार्गावर इराण आता ये-जा करणाऱ्या जहाजांवर टोल लावण्याचा विचार करत आहे. याचा थेट परिणाम जागतिक दरांवर होणार असून, या मार्गाने येणाऱ्या वस्तूंच्या किमती प्रचंड वाढून आकाशाला भिडण्याची शक्यता आहे.
आज ईदच्या चंद्राकडे पाहताना, काहींसाठी तो सणाचा प्रतीक असेल पण मध्यपूर्वेसाठी तो संघर्ष, प्रतिकार आणि बदलत्या शक्ती-समीकरणांचा संकेत ठरत आहे.

