​पौष्टिक तृणधान्यांच्या स्वादिष्ट पाककृतींनी नांदेडच्या कृषि महोत्सवाला दिली खास चव;पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेचे पारितोषिक वितरण

नांदेड​ – नांदेड येथील नवा मोंढा मैदान येथे १५ ते १७ मार्च २०२६ दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नांदेड जिल्हा कृषी महोत्सव २०२६ अंतर्गत १७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत बाजरी, राजगिरा, नाचणी, वरई, भगर यांसारख्या पौष्टिक तृणधान्यांपासून तयार केलेले विविध पदार्थ स्पर्धकांनी सादर केले.
सदर स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. सुरेखा कुलकर्णी (विभाग प्रमुख, होम सायन्स, केआरएम महिला महाविद्यालय, नांदेड) व प्रा. अलका पवळे (कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णी) यांनी केले.

स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे –
प्रथम क्रमांक – सौ. सुनीता अशोक कावळे, रेनापूर, ता. भोकर
(नाचणी व भगर लाडू)

द्वितीय क्रमांक – सौ. मनीषा सुरेशराव कदम, नांदेड
(भगर आप्पे व इडली)

तृतीय क्रमांक – सौ. अर्चना विजय क्षीरसागर, नांदेड
(नाचणी ढोकळा)
तसेच सर्व विजेत्यांना व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेचे पारितोषिक वितरण सेवानिवृत्त कृषी संचालक सुरेश अंबुलगेकर, दत्तकुमार कळसाईत (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड), कैलास वानखेडे (कृषी उपसंचालक), अनिल शिरफुले (उपविभागीय कृषी अधिकारी, नांदेड) व सौ. अर्चना गुंजकर (प्रकल्प उपसंचालक, आत्मा) यांच्या हस्ते करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!