नवीन सेवार्थ प्रणाली ई-बील संदर्भात प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

  नांदेड तालुक्यातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी 6 मार्च तर इतर तालुक्यातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी 10 मार्च रोजी प्रशिक्षणाचे आयोजन

 नांदेड -जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत नांदेड जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी नवीन सेवार्थ प्रणाली ई-बील संदर्भात प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 6 व 10 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी परिसरातील कॅबिनेट हॉल, नियोजन भवन, येथे करण्यात आले आहे. तरी लेखा विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी विक्रम देशमुख यांनी केले आहे.
                           नांदेड तालुक्यातील आहरण व संवितरण अधिकारी यांच्यासाठी शुक्रवार 6 मार्च रोजी सकाळी 11 वाजता तर नांदेड वगळता इतर सर्व तालुक्यातील आहरण व संवितरण अधिकारी यांचे अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी मंगळवार 10 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
                       संबंधित या प्रशिक्षण कार्यक्रमात नवीन सेवार्थ प्रणालीच्या कार्यपध्दती, अद्ययावत वैशिष्टे तसेच व्यवहारातील अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात अपर कोषागार अधिकारी वैशाली ताट पल्लेवार, अपर कोषागार अधिकारी नामदेव राठोड, नियुक्त मास्टर ट्रेनर तथा कनिष्ठ लेखापाल शंकर दुमाने, लेखा लिपिक प्रमोद शिंदे, बसवेश्वर वाळके, सुनिल संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. तरी सर्व संबंधित विभागानी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा व वेळेवर उपस्थित राहावे, असेही आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!