नांदेड:- आर्थिक वर्ष 2025-26 अखेर शासनाचा निधी अखर्चित राहू नये यासाठी 31 मार्च 2026 अखेर प्राप्त होणारी देयके पारित करून त्याच दिवशी आहरण व वितरण अधिकाऱ्यांना ई-कुबेर व धनादेशाद्वारे प्रदान करणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र कोषागार नियम 1968 मधील नियम 409 नुसार जिल्हाधिकाऱ्यांना कोषागारातील व्यवहारासाठी सुट्टीच्या दिवशीही बँका उघड्या ठेवण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने 31 मार्च 2026 रोजी शासनाचे कोषागाराशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत पार पाडण्यासाठी भारतीय स्टेट बँक तसेच शासनाचे व्यवहार हाताळणाऱ्या जिल्हा व तालुका स्तरावरील इतर बँकांच्या शाखा रात्री उशिरापर्यंत कार्यरत ठेवाव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहेत. Kanthak Suryatal Post Views: 492 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation Buy 1 Get 1: महिला आरक्षणसोबत डी-लिमिटेशन फ्री; लोकशाहीचा मेकओव्हर: सीट्स वाढल्या, समीकरणं बदलली उद्या रामनवमी निमित्त शोभायात्रा ; नागरिकांनी बंद रस्ते पाहूनच उद्याचा प्रवास ठरवावा