मुंबई (प्रतिनिधी)- बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या 2026 च्या निवडणुकीसंदर्भात उच्च अधिकार समितीने सात उमेदवारांना अपात्र ठरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या समितीचे प्रमुख न्यायमूर्ती श्रीरामजी (सेवानिवृत्त, मद्रास उच्च न्यायालय) यांनी आज झालेल्या सुनावणीनंतर हा आदेश दिला. तसेच संबंधित उमेदवारांनी भरलेली अनामत रक्कम जप्त करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. अपात्र ठरवण्यात आलेल्या सात उमेदवारांमध्ये अड़.सागर सलीम चित्रे, अड़.आशिष उर्फ जानकी जीवन दत्तात्रय गोदमगावकर,अड़. प्रकाश राजाराम जगताप, अड़.रवी प्रकाश जाधव, अड़.संजय रामचंद्र कोल्हापूरे, अड़.सय्यद आसिफ नकवी यांच्यासह आणखी एका उमेदवाराचा समावेश आहे. नांदेड येथील अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अड़.आशिष गोदमगावकर यांचेही नाव या यादीत असल्याचे समोर आले आहे. काही स्तरांवर ही यादी 13 जणांची असल्याची चर्चा असली तरी अधिकृत आदेशानुसार सात उमेदवार अपात्र ठरवण्यात आले आहेत. ही कारवाई BCI च्या 2016 च्या नियमांनुसार (BCI Rules 2016) करण्यात आली आहे. 2023 मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या होत्या; मात्र त्या मुख्यत्वे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वकिलांबाबत होत्या. त्यामुळे सद्य प्रकरणात 2016 चे मूळ नियम लागू करण्यात आले. BCI Rules 2016 च्या चॅप्टर 4, नियम 3 नुसार, ज्या व्यक्तींना बार कौन्सिल निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहायचे आहे त्यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वी संबंधित पदाचा राजीनामा देणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांना उमेदवारी देता येत नाही. या संदर्भात अड़. सय्यद एजाज अब्बास यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे हरकतीचे सादरीकरण केले होते. मात्र त्यावर अपेक्षित कार्यवाही न झाल्याने त्यांनी अपील दाखल केले. उच्च अधिकार समितीसमोर झालेल्या सुनावणीत अड़. समीर वैद्य, अड़.झैनब खान, अड़.चंद्रा राणी, अड़.अखिलेश शुक्ला आणि अड़. डी.व्ही. सरोज यांनी अपीलकर्ता अड़.सय्यद एजाज अब्बास यांची बाजू मांडली. सध्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणूक प्रक्रिया सुरू असून एकूण 25 सदस्यांची निवड केली जाते. त्यामध्ये 18 पुरुष, 5 महिला आणि 2 स्वीकृत सदस्यांचा समावेश असतो. निवडणूक पसंतीक्रम पद्धतीने घेतली जाते आणि मतमोजणीही त्याच नियमावलीनुसार केली जाते. निवडून आलेल्या 25 सदस्यांमधून अध्यक्षपदाची निवड केली जाते. दरम्यान, अड़.सय्यद एजाज अब्बास यांनी या संदर्भात सामाजिक माध्यमांवर माहिती देणारी रील प्रसारित केली असून या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेत मोठी खळबळ उडाली आहे. पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संबंधित रील ची लिंक …. https://www.instagram.com/reel/DVdx0HBiHBe/?igsh=cWRuempicWprcml3 Kanthak Suryatal Post Views: 999 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पत्रकारांविरुद्ध ही गोळीचेपी : होळीच्या व्यंगचित्रावरून देगलूरच्या आमदारांचा थयथयाट जैविक खत घोटाळ्यावर मंत्रालयात खळबळजनक बैठक; संबंधित संस्थांवर कठोर कारवाईची चिन्हे