रमजानच्या पवित्र महिन्यात मध्यपूर्वेत मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये अशी बातमी प्रसारित होत आहे की आयातुल्ला अली खामनाई यांच्या मृत्यूबाबत दावे केले जात आहेत. मात्र या वृत्तांची अधिकृत आणि स्वतंत्र पातळीवर संपूर्ण पुष्टी अद्याप स्पष्टपणे झालेली नाही. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. काही वृत्तांनुसार,इस्राईल सोबतच्या संयुक्त लष्करी कारवाईदरम्यान लक्ष्य केलेल्या हल्ल्यांमध्ये ही घटना घडल्याचा दावा करण्यात येत आहे. इराणने आपल्या देशात ४० दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केल्याची माहिती काही माध्यमांनी दिली आहे. १९८९ पासून सर्वोच्च नेता म्हणून कार्यरत असलेल्या खामेनाई यांच्या नेतृत्वाखाली इराणने अमेरिका आणि इस्रायलविरोधात आक्रमक धोरण स्वीकारले होते. सैनिकी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सर्वोच्च नेतृत्वाच्या उत्तराधिकाराबाबत इराणमध्ये आधीपासूनच स्पष्ट आराखडा तयार असल्याचे सांगितले जाते. दुसरा, तिसरा आणि पुढील संभाव्य पर्याय निश्चित ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे नेतृत्वातील बदलानंतरही इराण तात्काळ माघार घेईल, असे सध्या तरी म्हणणे कठीण आहे. दरम्यान, इराणकडून विविध ठिकाणी अमेरिकन हितसंबंधांवर आणि लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले झाल्याचेही वृत्त आहे. या संघर्षाचे पडसाद आता जागतिक स्तरावर उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मध्यपूर्वेतील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण असून युद्ध लवकर थांबेल असे चित्र सध्या दिसत नाही. पुढील २४ ते ४८ तास परिस्थिती कोणत्या दिशेने जाते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. Kanthak Suryatal Post Views: 643 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation आखाती देशातील भारतीय नागरिकांना मार्गदर्शक सूचना मोदींच्या इस्रायल दौऱ्यानंतर इराणवर हल्ला: भारताची भूमिका नेमकी कोणत्या बाजूला?