भोकर / नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर येत असून दोन वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे घडल्याची नोंद पोलिसांकडे करण्यात आली आहे. भोकर येथे दुकानफोडी भोकर तालुक्यातील नवीन मोंढा परिसरात अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली. दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 9.00 ते 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.00 वाजण्याच्या दरम्यान श्रीहरी कमिशन एजंट दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातील कपाट व काउंटरमधील सुमारे 69 हजार रुपये रोख रक्कम चोरी करून नेण्यात आली. याप्रकरणी तिरुपती सुमन सायन्ना पंतमवाड (वय 62, व्यवसाय व्यापारी, रा. भुर्सुशी ता. भोकर) यांच्या फिर्यादीवरून भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 81/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 331(4), 305(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. भाग्यनगर परिसरात चैन स्नॅचिंग दरम्यान, नांदेड शहरातील जयभवानी नगर रोड परिसरात 26 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 8.45 वाजता दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी एका महिलेच्या गळ्यातील सुमारे 80 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन हिसकावून पळ काढला. याबाबत गंगासागर सुनील नानवटे (वय 40, रा. जयभवानी नगर, नांदेड) यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 107/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 304(2), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 529 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने क्षमा करावी आज रंगधूळ! नैसर्गिक रंगांचाच वापर करण्याचे आवाहन