नांदेड – केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये हमीभावाने हरभरा खरेदी करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात एकूण २३ खरेदी केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. या खरेदीसाठी शेतकऱ्यांनी दि. ०१ मार्च २०२६ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. नाफेड (NCCF) मार्फत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असून मुदखेड, हदगाव, बिलोली, लोहा, देगलूर, किनवट, कंधार, मुखेड, नायगाव आदी तालुक्यांतील सहकारी संस्था व शेतमाल खरेदी-विक्री संघांची केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे. या केंद्रांवर मार्केटिंग फेडरेशनमार्फत हरभरा खरेदी केली जाणार असून शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी POS मशिनद्वारे करण्यात येणार आहे. नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी ७/१२ उतारा, आधारकार्ड तसेच राष्ट्रीयीकृत बँकेच्या पासबुकची प्रत संबंधित खरेदी केंद्रावर सादर करणे आवश्यक राहणार आहे. नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन असली तरी प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर उपस्थित राहून नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पात्र शेतकऱ्यांनी हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश गहाणे यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 579 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation महाशिबिर व योजनांच्या महामेळाव्यातून कायद्याची माहिती व शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवा – न्यायमूर्ती निरज धोटे इराणने ८ देशांवर हल्ला केला ४०० क्षेपणास्त्रे डागली