नाफेड (NCCF) मार्फत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असून मुदखेड, हदगाव, बिलोली, लोहा, देगलूर, किनवट, कंधार, मुखेड, नायगाव आदी तालुक्यांतील सहकारी संस्था व शेतमाल खरेदी-विक्री संघांची केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे. या केंद्रांवर मार्केटिंग फेडरेशनमार्फत हरभरा खरेदी केली जाणार असून शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी POS मशिनद्वारे करण्यात येणार आहे. नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी ७/१२ उतारा, आधारकार्ड तसेच राष्ट्रीयीकृत बँकेच्या पासबुकची प्रत संबंधित खरेदी केंद्रावर सादर करणे आवश्यक राहणार आहे. नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन असली तरी प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर उपस्थित राहून नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पात्र शेतकऱ्यांनी हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश गहाणे यांनी केले आहे.
नांदेड जिल्ह्यात हमीभावाने हरभरा खरेदीसाठी २३ खरेदी केंद्र निश्चित; ऑनलाईन नोंदणी सुरू