नांदेड – संचखड बोर्डातील कर्मचारी स. नवरतन सिंघ जी बेअंत सिंघ गाडीवाले (वय ५२) यांचे आज पहाटे उपचारादरम्यान दु:खद निधन झाले. ते काही दिवसांपासून हृदयविकाराने त्रस्त होते व त्यांची प्रकृती सातत्याने खालावत होती. आज सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास त्यांनी वयाच्या ५२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. स. नवरतन सिंघ गाडीवाले हे संचखड गुरुद्वाऱ्याचे माजी सचिव तसेच नांदेड महानगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष स. भुजंग सिंघ जी गाडीवाले यांचे पुतणे होत. त्यांच्या निधनाने गुरुद्वारा परिसर व समाजात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन बहिणी, सासू-सासरे असा मोठा परिवार आहे. त्यांची अंतिम यात्रा बडपुरा येथील त्यांच्या निवासस्थानापासून निघून गुरुद्वारा मार्गे नगिघाट येथे नेण्यात आली. तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजातील अनेक मान्यवर, गुरुद्वारा कर्मचारी तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स. नवरतन सिंघ गाडीवाले यांच्या निधनाने समाजातील एक कर्तृत्ववान व सेवाभावी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,063 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त भव्य प्रभात फेरी युद्धाच्या गोंधळलेल्या डोनाल्ड ट्रम्प वर पत्नी मेलानियाचा आरोप काय नवीन वाद आणणार