नांदेड – जिल्हा परिषद, नांदेड अंतर्गत समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय बांधवांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद २०टक्के सेस अंतर्गत खालील अर्थसहाय्याच्या योजना कार्यान्वित आहेत. योजना प्रकार : मागासवर्गीयांना व्यवसायासाठी अनुदान, मागासवर्गीय महिलांना व्यवसायासाठी अनुदान, प्रती लाभार्थी कमाल 40 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. प्रत्यक्ष खर्च कमी झाल्यास पावतीनुसार अनुदान देय राहील. अटी व शर्ती : योजना ग्रामीण भागातील (अ.जा./अ.ज./विजाभज) प्रवर्गातील पुरुष व महिलांसाठी स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी आहे. लाभार्थी ग्रामीण भागातील असावा. वय 18 ते 50 वर्षे दरम्यान असावे. वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले मूळ जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. रहिवासी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. उद्योगासाठी ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र (NOC) आवश्यक आहे. व्यवसायासाठी स्वतःची जागा असावी. भाड्याची जागा असल्यास भाडेकरार व पावती आवश्यक. अंतिम निवडीचे अधिकार विषय समिती/प्रशासनाकडे राहतील. लाभार्थ्याने जिल्हा परिषदेच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. व्यवसाय सुरू केल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेवक/ग्रामपंचायत अधिकारी/विस्तार अधिकारी (पंचायत समिती) यांचेकडून घेणे आवश्यक राहील. अर्ज प्रक्रिया : पात्र लाभार्थ्यांनी Website : mhdivyang.com संकेतस्थळावर नोंदणी करावी, त्यानंतर परिपूर्ण अर्ज पंचायत समितीमार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांच्या कार्यालयात 10 मार्च 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र वीरेंद्र आऊलवार यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 663 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत “राष्ट्रीय विज्ञान दिन” उत्साहात साजरा सहयोग कॅम्पस मध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा