नांदेड : महाराष्ट्र राज्य सरकारने यंदाच्या अधिवेशनात लोककलावंतांना विविध योजनेच्या माध्यमातून मदत करून देण्यासाठी व त्यांच्या आर्थिक उत्थाना करिता महाकवी वामनदादा कर्डक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून कलावंताचे जीवनमान उंचावणे व कलावंतांच्या दरमहा मासिक मानधनामध्ये वाढ करून विविध योजनेच्या माध्यमातून प्रश्न सोडून मार्गी लावावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा भारत वानखेडे प्रणित अनु.जाती /जमाती /ई.जा. /भज भटक्या विमुक्त जाती /अधिकारी कर्मचारी संघटना मंत्रालय मुंबईचे सांस्कृतिक शाखेचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद गजभारे यांनी केले आहे. गेल्या चार वर्षापासून भारत वानखेडे प्रणित अनु. जाती /जमाती /इजा /भज/भटक्या विमुक्त जाती जमाती अधिकारी कर्मचारी संघटना सांस्कृतिक शाखेच्या वतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री यांना वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा महाकवी वामनदादा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याकडे शासन असमर्थता दाखवीत आहे तरी राज्याचे अधिवेशन सुरु आहे ह्या अधिवेशनात हा महाकवी वामनदादा कर्डक आर्थिक विकास महामंडळाची स्थापन करण्याचा निर्णय करून लोककलावंतांना आर्थिक दृष्ट्या सबळ करावे अन्यथा मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मंत्रालयीन सांस्कृतिक शाखेचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद गजभारे यांनी नुकत्याच एका कलावंतांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आले आहे कलावंताच्या विविध मागण्या आहेत कलावंतांसाठी स्वतंत्र शहर रात कॉलनी स्थापन करून त्यांना मोफत घरकुले देण्यात यावी कलावंतांच्या आपत्यांसाठी मोफत शैक्षणिक आर्थिक तरतूद करावी कलावंतांसाठी शासकीय प्रवास मोफत करावा कलावंतांसाठी मोफत 15 लाखापर्यंत आरोग्य विमा देण्यात यावा अशा विविध मागण्यासाठी ही बैठकी आयोजित केली होती या बैठकीत जिल्ह्यातील असंख्य लोक कलावंत उपस्थित होते त्या बैठकीत एक मुखी प्रमोद गजभारे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली कलावंतांच्या ह्या जर मागण्या मान्य झाल्या नाही तर कलावंत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा केला आहे या बैठकीस आंबेडकरी चळवळीच्या मार्गदर्शक ज्येष्ठ नेते प्रभू सावंत ज्येष्ठ पत्रकार सुभाष लोणे प्रसिद्ध कलावंत अनंत पाटील जिल्हाध्यक्ष गंगाधर वडणे शुद्धधन कदम महेंद्र कदम गौतम पैठणे रतन चित्ते अंकुश कुमार चित्ते अविनाश नाईक भागवत सोनसळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. Kanthak Suryatal Post Views: 864 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारासाठी प्रस्ताव करण्यास मुदतवाढ अल्पवयीन बालकावरील अत्याचारप्रकरणी आरोपीस २० वर्षांची सक्तमजुरी