नांदेड – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) विभागीय कार्यालय नांदेड येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी 18 वर्षापासूनची परंपरा कायम राखत रयतेचे राजे, बहुजन प्रतिपालक, कुळवाडीभूषण, महान योद्धे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी सार्वजनिक जयंती दि.19 फेब्रुवारी 2026 गुरूवार रोजी सकाळी ठिक 11 वाजता तमाम एसटी कष्टकरी कामगार कर्मचाऱ्यांच्यावतीने मोठ्या हर्षेाउल्हासात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभाग नियंत्रक डॉ.चंद्रकांतराव वडसकर, हे होते तर विचारपीठावर प्रमुख उपस्थिती म्हणून आ.बालाजीराव कल्याणकर, माजी महापौर तथा नगरसेविका जयश्री निलेश पावडे, भाजपाचे महिला प्रदेश उपाध्यक्षा तथा मॉ जिजाऊ साहेब महिला आर्बन बँकेच्या अध्यक्षा प्रणिताताई देवरे, नगरसेविका सरिता बिरकले, पंचायत समिती नांदेडचे माजी अध्यक्षा संगीता विठ्ठलराव पाटील डक, भाग्यनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे, आरटीओ कार्यालयाचे दिलीपदादा गायकवाड, गिताई मजूर संस्थेचे अध्यक्ष मुन्ना कदम कोंढेकर, निखील चौधरी, बेंद्रीचे सरपंच सचिन पाटील बेंद्रीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्यांक सेलचे नांदेड जिल्हाध्यक्ष ॲड.जमीर पठाण मालीपटेल, जिजाऊ महिला ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा पाटील रावणगावकर, सुरक्षा व दक्षता अधिकारी गोविंदराव मुळे, गणेश कदम, चार्जमन प्रभाकर मोरे, माजी एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड, रामदास पेंडकर, आनंद कदम कोंडेकर, वाहतुक नियंत्रक सुनिल मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम वरील सर्व मान्यवरांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी वरील सर्व मान्यवरांचा संयोजन समितीच्यावतीने नंदूपाटील बेंद्रीकर, अभिषेक भाऊ ताकझुरे, बाळू पेंटेवाड, गजानन टोणगे, आम्रपाली शेळकीकर, गुणवंत एच.मिसलवाड, वैशाली गोदमवाड यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल, पुष्पहार देवून ह्दय सत्कार केला.
यावेळी उपरोक्त सर्व मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. शेवटी अध्यक्षीय समारोप विभाग नियंत्रक डॉ.चंद्रकांत वडसकर यांनी करून आपले मनोगत व्यक्त करून जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदू पाटील बेंद्रीकर यांनी केले तर सुत्रसंचालन गुणवंत एच.मिसलवाड यांनी केले. आभार प्रदर्शन बाळू पेंटेवाड यांनी मांडले. या कार्यक्रमास एसटी कष्टकरी, कामगार-कर्मचारी, बंधू-भगिनी व सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर लगेचच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राची एसटी वाहनाच्या रथातून मिरवणूक काढण्यात आली.
एसटी विभागीय कार्यालय नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहत साजरी
