नांदेड येथे २० वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन; ‘बाल मंच’साठी विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी! 

नांदेड – संवैधानिक मूल्यांना समर्पित २० वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन दिनांक २७, २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. कला, साहित्य, संस्कृती, भाषा, समाजकारण, अर्थकारण आदी विविध विषयांवर विचारमंथन होणार असून समाजात समता, बंधुता आणि एकात्मता वृद्धिंगत करण्याचा संमेलनाचा उद्देश आहे. संमेलनाच्या निमित्ताने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष ‘बाल मंच’ आयोजित करण्यात आला आहे.
        या मंचावर विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यात येणार आहे. वक्तृत्व, एकांकिका, प्रबोधनपर गीते, पोवाडा, जलसा, नाटक, कथाकथन, काव्यवाचन, परिसंवाद, रॅप सॉंग, चित्रकला, शिल्पकला, पथनाट्य आदी स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागाची संधी उपलब्ध होणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संमेलनाच्या व्यासपीठावर सादरीकरणाची संधी देऊन प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
              स्पर्धांसाठी नावनोंदणीची अंतिम तारीख १९ फेब्रुवारी २०२६ असून निवड चाचणी २१ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. शाळांनी आपल्या शिक्षक व विद्यार्थ्यांना या उपक्रमांत सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ‘बाल मंच’ संदर्भातील अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी बालाजी पाटोळे (मो. ८६५७९१३१५०) , डॉ. राम वाघमारे ( मो. ८२०८२९७९५२) डॉ. रेखा वाडेकर ( मो. ९७६६१४१७२८) , सुरेखा रावणगांवकर( मो. ९१७५७६६७७२) आणि डॉ. हेमंत कार्ले ( मो. ९४२३१४०३००) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!