आपल्याच शिक्षकाकडून 3 हजारांची लाच स्विकारणारा केंद्रप्रमुख एसीबीच्या जाळ्यात

नांदेड(प्रतिनिधी)-लोहा येथे नेमणूकीस असलेल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील केंद्रप्रमुखाने आज आपल्याच शिक्षकाकडून त्याची रजा मंजुर करून देण्यासाठी 3 हजार रुपये लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला गजाआड केले आहे. या प्रकरणी लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्तलिहिपर्यंत सुरू होती.
दि.12 फेबु्रवारी रोजी यातील तक्रारदार शिक्षकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की, इ.स.2018 मध्ये ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाद्रा ता.लोहा जि.नांदेड येथे प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत होते. दि.9 फेबु्रवारी 2026 रोजी त्यांनी त्यावेळेस आपण घेतलेल्या 46 दिवसांची अर्जित रजा मंजुर करून घेण्यासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती लोहा येथे अर्ज दिला. यावेळी केंद्र प्रमुख पदावर दिगंबर रामचंद्र शिंदे हे काम करत होते. गटशिक्षणाधिकारी व्यवहारे यांचे सर्व कामकाज तेच पाहत होते. दि.11 फेबु्रवारी रोजी तक्रारदार आपली रजा मंजुर झाली की, नाही हे पाहण्यासाठी तेथे गेले. तेंव्हा तेथील गटशिक्षणाधिकारी व्यवहारे आणि आपल्यासाठी 4 हजार रुपये द्यावे लागतील तरच तुमची रजा मंजुर होईल ही लाचेची मागणी असल्यामुळे त्यांनी तक्रार दिली.
13 फेब्रुवारी रोजी या लाच मागणीची पडताळणी झाली. तेंव्हा गटशिक्षणाधिकारी व्यवहारे यांनी तक्रारदाराला तुम्ही अगोदर मुख्याध्यापक पदाचा पदभार घ्या. मग तुमची रजा मंजुर करतो असे सांगितले. हे ऐकून तक्रारदार परत निघाले तेंव्हा दिगंबर शिंदे त्यांच्या पाठीमागे आले आणि म्हणाले की, 2-3 हजार रुपये देवून टाका तर तुमची रजा मंजुर करून घेतो. कधी देवू असा प्रश्न विचारला असता उद्या द्या, परवा द्या, तुमच्या मनाने कधी पण द्या. असे उत्तर दिगंबर शिंदे यांनी दिले.
16 फेबु्रवारी रोजी तक्रारदार शासकीय पंचासह केंद्रप्रमुख दिगंबर शिंदे यांच्याकडे लाचेची रक्कम 3 हजार रुपये घेवून पोहचले. तेंव्हा त्यांनी ते 3 हजार रुपये स्विकारले आणि लगेच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना ताब्यात घेतले. दिगंबर शिंदे यांची अंगझडती घेण्यात आली तेंव्हा एक मोबाईल आणि 2700 रुपये रोख रक्कम सापडली. त्यांच्या घराची झडती सुरू आहे. या प्रकरणी पोलीस निरिक्षक अनिता चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरुन लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा केंद्र प्रमुख शिक्षक (गट क) मुळ नेमणूक जिल्हा परिषद शाळा लिसलगाव ता.लोहा जि.नांदेड सध्या नेमणुक गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती लोहा येथील दिगंबर रामचंद्र शिंदे (57) यांच्याविरुध्द दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस उपअधिक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक अर्चना करपुडे या करणार आहेत. ही सापळा कार्यवाही एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस अंमलदार संतोष वच्चेवार, गजानन राऊत, राजेश राठोड, प्रकाश मामुलवाड, ईश्र्वर जाधव यंानी पुर्ण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!