नांदेड -इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या खाजगी अनुदानित विजाभज आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) येथे अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. हा दौरा बेंगलूरु, तिरुवनंतपुरम आणि कन्याकुमारी येथे 15 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पार पडणार आहे. राज्यभरातून परीक्षेद्वारे एकूण 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील 3 आश्रमशाळांमधील 10 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील विमुक्त जाती व भटक्या जमातीतील हे विद्यार्थी या शैक्षणिक दौर्यासाठी रवाना होणार असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक सचिन खुणे यांनी दिली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती पुढीलप्रमाणे — स्व. संगीता देवी उच्च माध्यमिक आश्रमशाळा, दहेली तांडा ता. किनवट कु. संजीवनी शिवाजी चव्हाण म. फुले मा. व. उच्च माध्यमिक आश्रमशाळा, वाघाळा ता. नांदेड चि. जाधव अमेय प्रेम चि. हेळगिरे दत्ता बालाजी विद्यानिकेतन (पब्लिक स्कूल), कमळेवाडी ता. मुखेड जि. नांदेड चि. आयुष अशोक पोफाळे चि. करण राम किशन चौगुले कु. कालेकर आश्विनी निवृत्ती कु. निकिता धोंडीबा केंद्रे कु. दुर्गा दत्ता खांडरे कु. दिक्षा जीवन चव्हाण चि. राहुल संभाजी शिरसाट इस्त्रोसारख्या राष्ट्रीय दर्जाच्या अंतराळ संशोधन संस्थेला भेट देण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या यशाबद्दल विद्यार्थ्यांवर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असून, ही बाब नांदेड जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरत आहे. Kanthak Suryatal Post Views: 502 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदत इयत्ता १२ वी परीक्षेसाठी 112 केंद्रांवर झूम वेबकाससह 16 फेब्रुवारीपासून ड्रोनद्वारे छायाचित्रण