नवीन नांदेड (प्रतिनिधी)- वडगाव येथील आकाश बालाजी पुयड खून प्रकरणातील दुसरा आरोपी अंकुश रामराव पुयड (वय ३१) याला नांदेड ग्रामीण पोलिसांनी १० फेब्रुवारी रोजी अटक केली आहे. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास वडगाव, ता. व जि. नांदेड येथे काही जणांनी आकाश बालाजी पुयड या युवकाचा खून केला होता. या घटनेनंतर भारत बालाजी पुयड यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०९/२०२६ दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना १० फेब्रुवारी रोजी नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोळकर, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे, पोलीस कर्मचारी वसंत केंद्रे, माळगे, समीर,आसिफ, जमीर, कांबळे आदींना गोपनीय माहिती मिळाली. संबंधित आरोपी अंकुश रामराव पुयड हा तुपा शिवार परिसरात लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचून त्याला जेरबंद केले. या यशस्वी कारवाईबद्दल इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत शिंदे यांनी नांदेड ग्रामीण पोलिसांचे कौतुक केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,833 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई; ४० लाखांचा हायवा व बेकायदेशीर वाळू जप्त दयाळ धानोरा येथील नऊ जणांवर अस्वलाचा हल्ला; एकाचा मृत्यू